जागावाटपाची प्रक्रिया सुमारे ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित जागांवर लवकरच सहमती होईल. निवडणुका संबंधित पक्षांच्या अधिकृत चिन्हांवरच लढवण्यात येणार असून, आघाडीतील सर्व घटक पक्ष परस्पर समन्वयाने प्रचार करणार आहेत.
मावळ तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणांसाठी उमेदवारी अर्जांची विक्री तसेच भरलेले अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था वडगाव येथील तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. शासकीय ठिकाणांवरील ५१७ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील २५१३ फलक, कोनशिला व झेंडे काढून टाकण्यात किंवा झाकण्यात आले.
जिल्ह्यात 14 जुलै ते 18 ऑगस्टदरम्यान प्रभागरचना कार्यक्रम राबविण्यात आला. 22 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानंतर आरक्षण निश्चित होणार आहे.