Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

नीतीश कुमार हे मुख्यमंत्री पद सोडून राज्यसभेच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2026 | 01:06 PM
Bihar Politics: Who will be the new Chief Minister of Bihar? BJP leader's suggestive statement

Bihar Politics: Who will be the new Chief Minister of Bihar? BJP leader's suggestive statement

Follow Us
Follow Us:
  • नीतीश कुमार राज्यसभेमध्ये जाण्याची शक्यता
  • बिहारचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार?
  • घराणेशाहीमुळे निशांत कुमारांना संधी मिळणार?
Next CM of Bihar : बिहार : बिहारच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. काहीच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नीतीश कुमार आणि भाजपच्या युतीला घवघवीत यश मिळाले. यानंतर नीतीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर आता नीतीश कुमार (Nitish Kumar) यांना दिल्लीचे वेध लागले असल्याचे दिसून आले आहे. नीतीश कुमार हे लवकरच राज्यसभा खासदार होणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये (Bihar Politics) चर्चांना उधाण आले आहे. नीतीश कुमार यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्रिपद कोण सांभाळणार याची चर्चा सुरु झाली आहे.

राज्यसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या असून यामुळे वेगवेगळी राजकीय समीकरणे समोर आली आहेत. गेल्या दोन दशकांपासून बिहारच्या राजकाऱणामध्ये किंगमेकर ठरल्यानंतर आता, नितीश कुमार यांचे अनेक वर्षांचे संसदीय कामकाजाचे स्वप्न लवकरच पुर्ण होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळणार की अनुभवी व्यक्ती पद सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर बिहारच्या राजकारणामध्ये घराणेशाही असल्यामुळे नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार? बिहारच्या राजकारणात काय आहे गेम चेंजर प्लॅन!

सम्राट चौधरी

जर नितीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडले तर सम्राट चौधरी हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. ८९ आमदारांसह भाजप हा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष आहे आणि सम्राट चौधरी यांच्याकडे अर्थ, आरोग्य, नगरविकास आणि गृहखाते अशी महत्त्वाची खाती आहेत. ते भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देखील आहेत आणि पक्ष संघटनेत त्यांची मजबूत पकड आहे.

विजय सिन्हा

विजय सिन्हा हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, परंतु भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून ते सम्राट चौधरी यांच्यापेक्षा थोडे मागे मानले जातात. ते तेजस्वी यादव यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि त्यांच्या आक्रमक शैलीमुळे राजकीय वर्तुळामध्ये लोकप्रियता मिळवली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याची आणि माफियांवर कठोर कारवाई करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे.

हे देखील वाचा : नितीश कुमार यांचा मुलगा निशांतची राजकारणात एन्ट्री; JDUमध्ये मोठी खांदेपालट होणार?

निशांत कुमार

निशांत कुमार यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी सक्रीय राजकारणामध्ये एन्ट्री झाली आहे. मात्र तरीही घराणेशाहीमुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. मात्र अनुभव कमी असल्यामुळे मुख्यमंत्री नाही तर ते उपमुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना राजकारणात नवीन मानले जाते आणि अद्याप त्यांचा मतदारांचा आधार नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी त्यांचे वडील नितीश कुमार यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आणि त्यांना एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले होते.

Web Title: Who will be new chief minister of bihar after nitish kumar in rajya sabha bihar political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Bihar Politics
  • Nitish Kumar
  • political news

संबंधित बातम्या

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
1

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
3

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
4

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.