Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बाबासाहेब आंबेडकरांना यांनीच त्रास दिला”; मुख्यमंत्री शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

डोबिंवलीत पार पडलेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 14, 2024 | 04:52 PM
"बाबासाहेब आंबेडकरांना यांनीच त्रास दिला"; मुख्यमंत्री शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

"बाबासाहेब आंबेडकरांना यांनीच त्रास दिला"; मुख्यमंत्री शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

डोंबिवली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी बुधवारी संध्याकाळी सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत तुम्ही राज्याच्या विकासाच्या योजनांना विरोध केला असे कडवे बोल सुनावले आहेत. तसंच  खुर्चीसाठी अनैसर्गिक आघाडी झाली असा शाब्दिक वार देखील शिंदेंनी केला.

मुख्यमंत्री शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

या सभेत शिंदे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि त्याच्या विचारधारेची आठवण करून दिली. बाबासाहेबांचे संविधान आजही आम्ही पाळत आहोत, असं शिंदेंनी सांगितलं.” जब तक सूरज चांद रहेगा, तब तक संविधान रहेगा” अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच काँग्रेसवर आरोप करत सांगितले की, ”  काँग्रेसने बाबासाहेबांना कायमच त्रास दिला,  काँग्रेसने त्यांचे आदेश पाळले नाहीत.”

महाविकास आघाडीच्या सरकारला आरोप करत शिंदे म्हणाले, “तुम्ही सरकार आले की हे बंद करू, ते बंद करू, पण सरकारची कामे सुरू ठेवायची होती. तुमच्याशी प्रतारणा केली. इथे खुर्ची साठी अनैसर्गिक आघाडी झाली.” यावर शिंदे यांनी महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांची निंदा केली आणि त्यांच्या सरकारच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली.

.शिंदे यांनी ‘अटल सेतू’, ‘नागपूर-मुंबई मेट्रो’ आणि अन्य प्रकल्पांची तुलना करत सांगितले की, महाविकास आघाडीच्या सरकारने काहीच प्रगती केली नाही. “तुम्ही मेट्रो बंद केली, मी ती चालू ठेवली. मोदींच्या शुभ हस्ते मेट्रोचा शुभारंभ झाला आणि आज त्यात 12 लाख प्रवासी प्रवास करतात. दुसऱ्या टप्प्यात 20 लाख प्रवासी प्रवास करतील,” असे त्यांनी म्हटले.

  महायुती संदर्भात बातम्यांसाठी इथे क्लीक करा 

राहुल गांधींवर केला हल्लाबोल

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी राहुल गांधींच्या भाषणातील मुद्दे खोडून काढले. शिंदे म्हणाले की, “हे देणं बँक आहे, घेणं बँक नाही.” त्यांनी लाडक्या बहिणी योजनेवरून सरकारच्या निधी वितरणाची चर्चा केली आणि स्पष्ट केले की, “आम्ही स्वच्छ नियत असलेले सरकार आहोत. आम्ही ऑक्टोबरमध्येच नव्हे, तर नोव्हेंबरमध्येही हप्ता दिला.”

पंतुप्रधान मोदी यांच्या संदर्भात बातम्यांसाठी इथे क्लिक करा

शिंदे यांचे वक्तव्य हे राज्यातील आगामी राजकीय वातावरणावर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोपांनी आणि विकासाच्या मुद्द्यांवर भर दिल्यामुळे, शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर घेतले. कल्याण ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांच्यासाठी जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर प्रहार केले. दरम्यान कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले की, कुठेही शेठगिरी आणि भाईगिरी करायची नाही. आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई चे कार्यकर्ते आहोत दिवस रात्र लोकांच्या सेवेत असतो. असंं मोरे यांनी सभेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

 

Web Title: It was babasaheb ambedkar who gave trouble chief minister shindes attack on congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • babsaheb ambedkar
  • BJP Shivsena Mahayuti
  • Cm Eknath Shinde

संबंधित बातम्या

LSE News : डॉ. बाबासाहेबांना डॉक्टरेट देणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार मास्टर्स
1

LSE News : डॉ. बाबासाहेबांना डॉक्टरेट देणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार मास्टर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.