Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जैन समाज शांतताप्रिय याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,’ जैन मुनी निलेश चंद्र यांचा संदीप देशपांडेंना इशारा

संदीप देशपांडेंच्या भूमिकेवर विरोध दर्शवत जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून "जैन समाज शांतताप्रिय असला याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या नाहीत," असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता हा वाद आणखी उफाळण्याची चिन्हे आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 13, 2026 | 07:25 PM
Jain Muni Nilesh Chandra slams MNS leader Sandip Deshpande,

Jain Muni Nilesh Chandra slams MNS leader Sandip Deshpande,

Follow Us
Follow Us:

घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन कुटुंबीयांनी कोणाचीही परवानगी न घेता येण्याजाण्याच्या मार्गावर पांढरी पट्टी मारली होती. यावरून प्रसिद्ध रिल्सस्टार प्रासाद वेदपाठक याने प्रश्न उपस्थित करून आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली होती. यावरून मोठा गदारोळ निर्माण होत राज्यात विविध प्रतिक्रिया येत होत्या. आता हा वाद राजकीय स्तरावर पोहोचला असून यात मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावरून महापालिकेला थेट इशारा दिला आहे. त्यातच आता संदीप देशपांडेंच्या भूमिकेवर विरोध दर्शवत जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून “जैन समाज शांतताप्रिय असला याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता हा वाद आणखी उफाळण्याची चिन्हे आहेत.

नेमके प्रकरण काय?

रिल्सस्टार प्रसाद वेदपाठक यांच्या व्हिडियोंनंतर या विषयावरून राज्यभर चर्चा सुरु झाल्या. यानंतर मनसेने या वादात उडी घेतली. मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. दादर पश्चिम येथील डीएस बावरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारल्याने संदीप देशपांडे यांनी आक्षेप घेतला. बावरेकर मार्गावरील जैन मंदिरालगत मारण्यात आलेल्या या पट्ट्यांवरून संदीप देशपांडे यांनी महानगरपालिकेला इशारा दिला होता. त्यावरून आता जैन मुनी निलेश चंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut News: मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

काय म्हणाले जैन मुनी?

जैन मुनी निलेशचंद्र यांनी यावरून संदीप देशपांडे यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. ते यावेळी म्हणाले, “संदीप देशपांडे दोन समाजांमध्ये दरी निर्माण करत आहेत. जैन समाज शांतताप्रिय आहे. याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत. पण, जैन समाजाला मी आव्हान करतो कि, तुम्ही शांतता राखा, जास्त विरोध करू नका.”

ते पुढे म्हणाले, “संदीप देशपांडे जर बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जात असतील तर बाळासाहेब ठाकरे यांनी जैन, मारवाडी लोकांवर प्रेम केलं, त्यांनी कुठलाही त्रास दिला नाही,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘संदीप देशपांडे जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुम्ही मुंब्रा, भेंडी बाजार, पायधुणीला जा. तिथे ज्याप्रकारे ईदच्या दिवशी किंवा नमाज पढताना रस्त्यावर पांढरे घालून बसतात त्याला विरोध करा. मुंब्रामध्ये एमआयएमची नगरसेविका म्हणते मुंब्रा हरा कर दूंगी त्याला तुम्ही विरोध करा. तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका,” असे ते यावेळी म्हणाले.

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विलीनीकरण? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; ‘सध्या देश वाचवण्याची गरज…’

Web Title: Jain muni nilesh chandra slams mns leader sandip deshpande

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • MNS
  • sandip deshpande

संबंधित बातम्या

‘हे नेमकं काय चाललंय?’ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंचा संताप; सरकारला थेट सवाल
1

‘हे नेमकं काय चाललंय?’ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंचा संताप; सरकारला थेट सवाल

Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसे संघर्ष पेटला; ‘सलाम-डकार’वरून नंदू परब आणि मनसे आमनेसामने
2

Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसे संघर्ष पेटला; ‘सलाम-डकार’वरून नंदू परब आणि मनसे आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.