v
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा
निवडणुकीआधी नीतीश कुमार यांना धक्का
दोन टप्प्यात होणार विधानसभा निवडणूक
Nitish Kumar: बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा बिहारमध्ये एनडीए विरुद्ध अन्य विरोधी पक्ष अशी लढाई होणार आहे. मात्र विधानसभा निवडणूक होण्याआधीच नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडली आहे.
जेडीयू म्हणजेच जनता दल युनायटेड हा पक्ष नितीश कुमार यांचा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार यांना धक्का बसला आहे. जेडीयू पक्षाचे माजी खासदार, आमदार यांनी तेजस्वी यादव यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तेजस्वी यादव यांनी विधानसभा निवडणुकीआधीच नितीश कुमार यांना धक्का दिला आहे.
राजद पक्षामध्ये तेजवी यादव यांच्या उपस्थितीमध्ये जेडीयूच्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. जेडीयूचे विद्यमान खासदार गिरधारी यादव यांचे सुपुत्र देखील राजदमध्ये सामील झाले आहेत. आज पटणा येथे तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
बिहारचे सरकार हे नितीश कुमार नव्हे तर दिल्लीतील भाजप चालवत असल्याचा आरोप केला. ज्या लोकांनी जेडीयूसाठी मेहनत केली त्या नेत्यांना एनडीएमध्ये महत्व मिळत नसल्याचे तेजस्वी यादव म्हणाले. भाजप जेडीयूला संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याचे आकलन नितीश कुमार यांना झाले तेव्हा ते आमच्यासोबत आले. काही दिवस आम्ही एकत्रित सरकार चालवले.
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव
प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या जन सुराज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध जाती-धर्मातील, क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे. बिहारमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आल्याचे जन सुराज पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी
प्रशांत किशोर यांनी 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 11 उमेदवार हे ओबीसी आहेत. तर 17 उमेदवार ईबीसी प्रवर्गातील आहेत. तर 9 उमेदवार हे अल्पसंख्यांक असल्याचे समजते आहे. उर्वरित उमेदवार हे सामान्य प्रवर्गातील आहेत. जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर म्हणाले, ‘बिहारमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे.’ दरम्यान प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढवणार की हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.