जनसुराज पक्षाने जाहीर केली उमेदवारांची यादी (फोटो- ani)
प्रशांत किशोर यांनी जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
दोन टप्प्यात होणार बिहार विधानसभा निवडणूक
Prashant Kishore: बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला निकल जाहीर होणार आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या जन सुराज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता लवकरच अन्य पक्ष देखील लवकरच आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध जाती-धर्मातील, क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे. बिहारमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आल्याचे जन सुराज पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांनी 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 11 उमेदवार हे ओबीसी आहेत. तर 17 उमेदवार ईबीसी प्रवर्गातील आहेत. तर 9 उमेदवार हे अल्पसंख्यांक असल्याचे समजते आहे. उर्वरित उमेदवार हे सामान्य प्रवर्गातील आहेत. जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर म्हणाले, ‘बिहारमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे.’ दरम्यान प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढवणार की हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला?
बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभेचा निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत एनडीएची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीआधी एनडीएमध्ये जागावाटपावर एकमत झाल्याचे दिसून येत आहे. एनडीएमध्ये सर्व जागांवर एकमत झाल्याचे समजते आहे. एनडीए बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणारी यादी ही संयुक्तिक असण्याची शक्यता आहे.
Bihar Elections 2025: बिहार राजकारणाचा ‘किंगमेकर; एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचे मत निर्णायक
भाजप, जेडीयू, एलजेपी आणि अन्य सहकारी पक्षांची अशी एकत्रित यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी जागावाटपावर सहमती करण्याची जबाबदारी भाजपवर देण्यात आल्याचे समजते आहे. चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशावाह यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी भाजपवर असल्याचे समजते आहे.