Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keralam CM Suspence: केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम! वेणुगोपाल, सतीशन की चेन्नीथला?

पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी आणि तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी केरळमध्ये ८ दिवसांनंतरही नाव निश्चित झालेले नाही

  • By anuradha sagar
Updated On: May 11, 2026 | 05:00 PM
CM, Congress, UDF Kerala, KC Venugopal,

CM, Congress, UDF Kerala, KC Venugopal,

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला यांची नावे आघाडीवर
  • सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ए. के. अँटनी यांच्यातील चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अंतिम नाव जाहीर करतील.
  • प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनी सर्व नेत्यांना आणि समर्थकांना वादग्रस्त विधाने टाळण्याचा कडक सल्ला दिला आहे.
Keralam  Assembly Election 2026: पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला होता. पण अवघ्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपती मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पण निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आज आठ दिवस उलटून गेले तरी केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अद्याप कायम आहे. याबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

दरम्यानस मिळालेल्या माहितीनुसार, केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भातील चर्चा तीव्र झाली आहे. केपीसीसी अध्यक्ष सनी जोसेफ यांनी रविवारी (१० मे, २०२६) सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच केरळच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने तीन प्रमुख दावेदारांशी आधीच चर्चा केली आहे.

PM Modi on Work From Home : नरेंद्र मोदींकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ चे आवाहन!काटकसर की संकटाची चाहूल?

नवी दिल्लीहून परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सनी जोसेफ म्हणाले की, या विषयावर राज्यातील नेत्यांशी चर्चेची दुसरी फेरी घेण्याची गरज आहे असे त्यांना वाटत नाही. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केव्हा केली जाईल. याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. पण सर्व नेत्यांना कोणताही वाद किंवा कोणतेही आक्षेपार्ह विधाने टाळण्याचा सल्ला दिला आहे. संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) च्या मित्रपक्षांशी चर्चा होईल का, असे विचारले असता, काँग्रेस हायकमांड तो निर्णय घेईल,असं त्यांनी नमुद केलं.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण आहे?

पक्षातील सूत्रांनुसार, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सध्या, के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक संभाव्य दावेदार मानले जात आहेत. या तिन्ही नेत्यांचे समर्थक आपापले दावे मजबूत असल्याचे मानतात. वेणुगोपाल यांच्या गटाला, काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाच्या मताला अधिक महत्त्व देईल, असा विश्वास आहे. तर त्यांची जनतेमधील लोकप्रियता आणि यूडीएफ मित्रपक्षांचा पाठिंबा यामुळे त्यांचा दावा अधिक मजबूत असल्याचे सतीशन यांच्या समर्थकांचे मत आहे.

CM Devendra Fadnavis: “राहुल गांधी हे राजकारणातील ‘सर्वात रिजेक्टेड माल’!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती प्रहार

रमेश चेन्नीथला यांच्याकडूनही दावेदारी

रमेश चेन्नीथला हे देखील आपल्या उमेदवारीबद्दल खूप आशावादी असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या व्यापक राजकीय अनुभवाच्या आणि ज्येष्ठतेच्या आधारावर, पक्ष नेतृत्व त्यांना यावेळी संधी देईल अशी त्यांना आशा आहे. सूत्रांनुसार, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला दोघेही यावर समाधानी आहेत की, हायकमांडने त्यांना आपली मते सविस्तरपणे मांडण्याची पुरेशी संधी दिली. आता सगळ्यांच्या नजरा काँग्रेस नेतृत्वाच्या अंतिम निर्णयावर लागल्या आहेत.

 

Web Title: Kerala cm suspense continues kc venugopal vd satheesan or ramesh chennithala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.