कोरटकरची पाच तास कसून चौकशी सावंतांना फोन केल्याची कबुली
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर हा चर्चेत आहे. प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वी कोरटकरला अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. मात्र आता कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने कोरटकरचा अंतरिम जामीन फेटाळला आहे. न्यायालयाने हा निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे प्रशांत कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे. तो 25 फेब्रुवारीपासून फरार आहे. त्याला आधी अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. मात्र तरी देखील तो पोलिसांकडे आलेला नाही. जबाब नोंदवण्यासाठी आणि आवाजाचे नमुने देण्यासाठी प्रशांत कोरटकरने पोलिसांकडे येणे अपेक्षित होते. मात्र अजूनही तो न आल्यामुळे आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आता मात्र कोरटकरचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकर याला अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र हा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. राज्यभरामध्ये कोरटकर विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. आता न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केल्यामुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. कोल्हापूर पोलिसांचे दोन पथक प्रशांत कोरटकरच्या मागावर आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. मात्र अटकपूर्व जामीन फेटाळला शिवाय सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली असली तरी सुद्धा प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण आलेला नाही. दरम्यान त्याचा शोध घेण्यासतही पोलिसांच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोरटकरच्या अंतरिम जामिनावर 17 मार्च रोजी युक्तिवाद झाला होता. यावेळी इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असीम सरोदे यांनी मांडली होती. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. गुन्हा दाखल होताच कोरकटर तो माझा आवाज नाही म्हणत फरार झाला, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर आरोपी प्रशांत कोरटकर याची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली आहे. आता कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.