"या कटात एक विषारी मंत्री"; प्रकाश आंबडेकरांनी सांगितलं नागपूरमध्ये दंगल का आणि कोणी घडवली?
पुणे : महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि फूट पाडत आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे. हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना आवाहन आहे की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्र का एक विषैला मंत्री सरेआम समाज में नफरत फैलाने और बाटने का काम कर रहा हें। यही नही बल्की महाराष्ट्र में नफ़रत फैलाने के लिये बाहर से लोग लाये जा रहे हें।
ये एक बड़ी सोची-समझी साजिश का हिस्सा हैं!
नागपूर सहित सभी लोगो से अपील हें की अफ़वाओ पे ध्यान ना दे और शांती…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 18, 2025
प्रकाश आंबेडकर म्हणतात, “माझ्या कार्यकर्त्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार, हिरवे कापड घातलेल्या मझारचा पुतळा जाळण्यात आला. पहिली अफवा अशी होती की हिरवा मझार जाळण्यात आला. नमाज सुरू होण्यापूर्वी, एक शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांकडे गेलं आणि त्यांना भेटलं. आणि त्यांनी त्यांना सांगितले की एक अफवा पसरवली जात आहे. नमाज संपण्यापूर्वी पोलिसांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी होती. अफवा अशी होती की कुराण जाळण्यात आलं. जर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या या दोन अहवालांवर कारवाई केली असती आणि कुराण जाळण्यात आले नाही आणि हिरवे कापड जाळण्यात आले नाही. असं विधान केलं असतं, तर मला वाटते की परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती. मी असे म्हणणार नाही की पोलिसांनाच जबाबदार धरले पाहिजे. परंतु मुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूंना दोष दिला पाहिजे. मुख्यमंत्री फक्त एकावरच कारवाई करण्याची भाषा करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Pune | Vanchit Bahujan Aaghadi, President, Prakash Ambedkar says, “As far as the information that is given to me by my workers, is that the effigy of the Mazar on which a green cloth was laid was burnt. The first rumour was that the green Mazar was burned…Before the… pic.twitter.com/gZNMNEive3
— ANI (@ANI) March 18, 2025
नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या सोमवारी रात्री राडा झाला होता. यात बाहेरून लोक आणले होते असा दावा भाजपच्या आमदाराने केला होता. तर याप्रकरणावर विधानसभेत निवेदन सादर करताना पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांना सोडणार नाही. तर कोणालाच कायदा हातात घेऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.