Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ते योगी नाही तर सत्ताभोगी, स्वतःला फकीर म्हणवणारे…’; काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात. पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही, तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2025 | 09:24 AM
'ते योगी नाही तर सत्ताभोगी, स्वतःला फकीर म्हणवणारे...'; काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

'ते योगी नाही तर सत्ताभोगी, स्वतःला फकीर म्हणवणारे...'; काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

मुंबई : नरेंद्र मोदी हे 11 वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत पण 11 वर्षांत त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून, जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनंतर ही यात्रा 15 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारपासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. गुरूवारी गडचिरोलीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ‘आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात. पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही, तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. स्टील सीटी करण्याच्या नावाखाली तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ, असे भाजप-युती सरकारचे सुरू आहे. शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे’.

सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. कर्जमाफी देत नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नव्हते तर घोषणा का केल्या. शेतकऱ्यांशी बेईमानी करणा-या महायुती सरकारला धडा शिकवावाच लागेल. लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, २१०० रुपये देण्याची घोषणा केली पण आता १५०० रुपयेही मिळणे अवघड झाले आहे.

– विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते, काँग्रेस.

गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. फडणवीस यांना गडचिरोलीचे फडणवीसस्थान करायचे आहे. सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खदानीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते.

Web Title: Maharashtra congress president harshwardhan sapkal criticized on pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Politics
  • narendra modi

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.