Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis News: पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य संकटावर सरकारने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पाण्याचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 28, 2026 | 08:41 AM
Devendra Fadnavis, Maharashtra Drought, Water Management, Gadchiroli Flood,

Devendra Fadnavis, Maharashtra Drought, Water Management, Gadchiroli Flood,

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, मदतकार्य सुरू
  • जुलै-ऑगस्ट २०२७ पर्यंत धरण साठा पुरवण्याचे पाणी नियोजनाचे निर्देश
  • लग्नकार्यांमधील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन
Devendra Fadnavis News: राज्यात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने मदतकार्याला सुरुवात केली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रत्येकाने संवेदनशीलता दाखवून अनावश्यक खर्च टाळावा, तसेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाईला सामोरे जाण्याची तयारी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागरिकांना केले. दरम्यान, मोठ्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा जुलै-ऑगस्ट २०२७पर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभआणि इतर कार्यक्रमांमध्ये खर्च कमी करण्याबाबत फडणवीस म्हणाले, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये संवेदनशीलता ठेवणे आवश्यक आहे. थोडा खर्च कमी करणे किंवा आवश्यक गोष्टींवरच खर्च करणे गरजेचे आहे, काही आवश्यक बाबींवरील खर्च करावाच लागतो. मात्र, ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात किंवा कमी प्रमाणात करता येऊ शकतात, त्या कमी कराव्यात. त्यातून होणारी बचत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीच्या स्वरूपात वापरता येऊ शकते. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर इतर स्वरूपाची मदतही नागरिकांनी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

गडचिरोलीतील पूरग्रस्तांना मदत

छत्तीसगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून आवश्यक मदत दिली जात असून प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले पूरस्थिती हळूहळू निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाण्याचे नियोजन सुरू

पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य संकटावर सरकारने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पाण्याचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील पाण्याची गरज याचा आढावा घेऊन जुलै-ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, याची खात्री करण्यावर भर दिला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एल निनोचा परिणाम लक्षात घेऊन तयारीः एल निनोच्या स्थितीबाबतही सरकार लक्ष ठेवून आहे. सध्या असलेला एल निनो आणखी वाढण्याची शक्यता असून, तो फेब्रुवारीपर्यंत उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे.

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार

यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांनाही दिलासा

कोरड्या दुष्काळाच्या यादीत काही तालुके समाविष्ट झाले नसल्याच्या तक्रारी सरकारकडे येत आहेत. या तालुक्यांचीही पाहणी केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना ‘ट्रिगर-३’ अंतर्गत समाविष्ट करून मदत देण्यात येईल. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Maharashtracm devendra fadnavis drought relief water management 265 talukas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
2

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
3

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.