Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…

Devendra Fadnavis on Gokul Milk Politics: कोरम झाला नाही तर अध्यक्षाची निवड करता येत नाही. जर एका गटाने बहिष्कार टाकला किंवा ते अनुपस्थित राहिले तर अध्यक्षाची निवड होऊ शकत नाही. अध्यक्ष निवडीच्या दिवशी एक गट अनुपस्थित राहिल्याने ती निवडणूक झाली नाही. कोर्टात केस गेल्यावर कोर्टाने १० तारखेला निवडणूक घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 07, 2026 | 05:42 PM
Gokul Milk Union, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Satej Patil

Gokul Milk Union, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Satej Patil

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट
  • १० नोव्हेंबरच्या अध्यक्ष निवडीवर भाष्य
  • कायदेशीर तांत्रिक बाजू स्पष्ट
 Kolhapur Gokul Milk Union Politics:   कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर सुरु असलेल्या घडामोडींवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने गोकुळवर पाच शासन नियुक्त संचालक निर्णय नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन शिंदे गटाने राज्य सरकारवर जोरदार टिका केली होती. ‘गोकुळमध्ये राजकारण केलं जाऊ नये, जनमताचा कौल मानायला हवा.’ असं शिंदे गटाने म्हटलं होते. शिंदे गटाच्या या प्रतिक्रीयेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनीच मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या संमतीने हा निर्णय घेतला, असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाचा विषय चांगलाच तापला आहे. सतेज पाटील यांच्या पॅनेलने गोकुळ निवडणुकीत बाजी मारत २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. महायुतीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून १२ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे, संचालक निवडीचा पेच आणखीनच वाढला. त्यातच आता राज्य सरकारने ५ स्वीकृत संचालकांची नियुक्ती केल्याने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या घडामोडींवर शिंदे गटाने केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

कोरम झाला नाही तर अध्यक्षाची निवड करता येत नाही-देवेंद्र फडणवीस

आज दुपारी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “कोरम झाला नाही तर अध्यक्षाची निवड करता येत नाही. जर एका गटाने बहिष्कार टाकला किंवा ते अनुपस्थित राहिले तर अध्यक्षाची निवड होऊ शकत नाही. अध्यक्ष निवडीच्या दिवशी एक गट अनुपस्थित राहिल्याने ती निवडणूक झाली नाही. कोर्टात केस गेल्यावर कोर्टाने १० तारखेला निवडणूक घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. पण १० तारखेला कोरम झाला नाहीतर कोरमशिवाय निवडणूक घ्या असं कोर्टाने म्हटलेलं नाही. त्यामुळे ही निवड होऊ शकणार नाही. गोकुळचे कायदा आणि नियम पाहिले तर तीन वेळा अशा पद्धतीने निवड झाली नाही तर सर्व अधिकार DDR कडे जातील त्यामुळे निर्वाचित सदस्यांना ते अधिकार राहणार नाहीत त्यामुळे कोरम पूर्ण झाला यासाठी, काही लोकांना मतांचा अधिकार देऊन अध्यक्षाची निवड करण्याकरता हा कायदा करण्यात आला आहे.”

गोकुळची निवडणूक एका जिल्ह्यापुरती- देवेंद्र फडणवीस

हा वैधानिक प्रश्न निर्माण झाल्याने दोन्ही बाजुला कोरम पूर्ण करण्याइती मते नाहीत, हा कोरम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला गोकुळवर कब्जा करायचा आहे, अशी भावना चुकीची आहे. गोकुळची निवडणूक एका जिल्ह्यापुरती आहे. काही तालुक्यांमध्या गोकुळचा प्रभाव आहे, त्यामुळे एका संस्थेकरता राज्य सरकार आतुर आहे, असं काही नाही. राज्य सरकारला हे काही करण्याची गरज नाही. दोन्ही गटांनी बसून हा निर्णय घेतला, तर यांची गरज पडणार नाही. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांच्या गटांनी एकत्र बसून निर्णय घेत असतील तर सरकार कोणालाही पाठवणार नाहीत. सरकारला फक्त वैधानिक जबाबदारी पार पाडायची आहे. असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार

गोकुळवर कब्जा करण्यात राज्य सरकारला काहीही रस नाही- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरमशिवाय वारंवार बैठक स्थगित झाल्यास सर्व अधिकार पुन्हा सरकारकडे येणार आहेत. सरकारला गोकुळवर कब्जाच करायचा असेल तर सरकार DDR च्या माध्यमातून पुढच्या गोष्टी होती. गोकुळ ही काही मोठी संस्था नाही. गोकुळवर कब्जा करण्यात राज्य सरकारला काहीही रस नाही. गोकुळच्या निवडणुकीला राजकीय रंग देणं योग्य नाही. त्यांनी आपापसात बसून यावर तोडगा काढावा.

गोकुळबाबत जो निर्णय घेतला त्यावेळी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षांनी एकत्र येऊन सांगितलं की गोकुळमध्ये अशा प्रकारचा वैधानिक पेच आहे. त्यानंतर महाअधिवक्ते, लॉ अँड ज्युडिशिअरी यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावर जो प्रस्ताव आला, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि मी स्वत: आमच्या तिघांची चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव आला आहे. शासन म्हणून हा निर्णय घेताल आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाची राजी, नाराजी असं काहीही नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que:  गोकुळ दूध संघावरील ५ तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय खुलासा केला?

    Ans:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पूर्ण संमतीने आणि सहमतीनेच ५ शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला, असा खुलासा फडणवीसांनी केला.

  • Que:  १० नोव्हेंबरच्या गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत मुख्यमंत्र्यांनी काय तांत्रिक अडचण स्पष्ट केली?

    Ans: अध्यक्ष निवडीच्या दिवशी कोरम पूर्ण झाला नाही, तर निवडणूक होऊ शकत नाही. न्यायालयाने १० नोव्हेंबरला निवडणूक घेण्यास सांगितले असले, तरी कोरमशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले नाहीत.

  • Que:  गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या आहेत?

    Ans:  सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला २५ पैकी १३ जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला १२ जागांवर विजय मिळाला आहे.

Web Title: Gokul milk row cm fadnavis reveals eknath shinde sunetra pawar consent as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Gokul Milk
  • Kolhapur Politics
  • Satej Patil
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Gokul Dudh Sangh: माजी सरन्यायाधीशांचा मोठा सल्ला, महायुती सरकारची अडचण होणार?
1

Gokul Dudh Sangh: माजी सरन्यायाधीशांचा मोठा सल्ला, महायुती सरकारची अडचण होणार?

Gokul Politics : अलिबाग नाही, थेट उदयपूर! महायुतीचे १२ संचालक आहेत कुठे? सतेज पाटलांनी सगळंच सांगितलं
2

Gokul Politics : अलिबाग नाही, थेट उदयपूर! महायुतीचे १२ संचालक आहेत कुठे? सतेज पाटलांनी सगळंच सांगितलं

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?
3

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा
4

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.