
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित गट) कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पक्षातील अंतर्गत शिथिलतेवर सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नेते आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या कामकाजात आणि संघटनेत काही प्रमाणात उदासीनता निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष वाढवण्यासाठी
सर्वांनी पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रिय व्हावे, अशी स्पष्ट सूचना यांनी बैठकीत केली. ‘कामाला लागा, जे सक्रिय नाहीत त्यांना बदला’, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांना बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस
दरम्यान, तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद वाढवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी पक्षाच्या विस्तारासाठी काम करावे, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली. निष्क्रय पदाधिकाऱ्यांना बाजूला करून तरुण आणि पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचे संकेत बैठकीतून मिळाले.
बैठकीला अनेक महत्त्वाची उपस्थिती
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, वरिष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पातळीवर लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या संघटनेत होणार मोठे बदल
प्रदेश पातळीवरील ज्या पदाधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नाही किंवा जे पक्षाच्या कार्यात सक्रिय नाहीत, त्यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी काम करणाऱ्या आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे निर्देश त्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त अशी स्पष्ट सूचना सुनेत्रा पवार यांनी केली जात आहे.
पक्षात काही अतृप्त आत्मे
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासू मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या नोटीसमुळे पक्षात आणि राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.