Manikrao Kokate and Minister of State for Home Yogesh Kadam resignation Vadgaon Maval News
वडगाव मावळ : मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चर्चेत आले आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असताना ते विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना दिसून आले.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकर्यांबाबत असंसदीय भाषा वापरतात, विधानसभेत रमीचा खेळ खेळतात, शासन भिकारी असल्याचे सांगतात, गृहराज्यमंत्री योगेश कदम डान्सबार चालवतात अशी व्यक्ती मंत्री म्हणून राहण्यास पात्र नाही. कदम व कोकाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, तसेच मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी मावळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे
यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब फाटक भारत ठाकुर,आशिष ठोंबरे भरत होते शांताराम भोते, बाळासाहेब शिंदे, उमेश गावडे, राहुल नखाते,अनिल ओव्हाळ, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यातील शेतकर्यांबद्दल असंसदीय भाषा वापर करणे, पंचनाम्यासाठी अरेरावीची भाषा करणे, अधिवेशन सुरू असताना चक्क सभागृहात मोबाईलवर रमी खेळणे, वारंवार बेजबाबदार वक्तव्ये करणे, यामुळे शेतकरी व महाराष्ट्राची बदनामी होत आहे. कोकाटे यांच्या या अशोभनीय कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.अशी बेजबाबदार व अहंकारी व्यक्ती राज्याच्या मंत्रिपदावर राहण्यास पात्र नाही. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्सबार चालतो अशा वादग्रस्त मंत्र्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी याबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मावळ तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याच्या मंत्रिमंडळातील नेत्यांबाबत अनेक मोठे दावे समोर येत आहेत. अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता ते थेट जंगली रमी खेळताना दिसून आल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तर मी खेळत नव्हतो जाहिरात मध्ये आली असल्याचा दावा कोकाटे यांनी केला आहे. मात्र त्यांचे आणखी दोन व्हिडिओ विरोधकांनी शेअर केले आहेत. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर डान्सबार असून तो दुसऱ्या व्यक्तीला चालवायला दिला असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील मंत्र्यांच्या या कारभारावर ताशेरे ओढले जात असून यांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.