Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

अंतरवाली सराटीत अभ्यासकांसोबत झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. सरकारच्या जीआरमध्ये सुधारणा, कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅझेटियरच्या मुद्द्यावर त्यांनी भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 03:50 PM
मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार

Follow Us
Follow Us:
  • 29 ऑगस्टच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • सरकारच्या जीआरमधील चुका मान्य करून त्यात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
  • हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर चर्चा झाली.
 

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला आंदोलनाची हाक दिली असून, त्याच्या पार्श्वभूमीवर अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत यापूर्वी सरकारसमोर मांडलेल्या मागण्या, त्यातील कायदेशीर बाबी आणि सरकारकडून जारी करण्यात आलेल्या जीआरवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

बैठकीनंतर बोलताना जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत आक्रमक भूमिका कायम ठेवली. आंदोलनाच्या मार्गावरून माघार घेणार नसल्याचे सांगत त्यांनी, ‘जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम राहणार’ असा निर्धार व्यक्त केला.

सरकारच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याची मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, बैठकीत तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी सरकारने काढलेल्या जीआरमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, भविष्यातील जीआर कशा पद्धतीने काढले जावेत आणि ओबीसी सवलतींच्या संदर्भात काय भूमिका असावी, यावर अभ्यासकांकडून माहिती घेण्यात आली.

जातनिहाय जनगणनेवरून छगन भुजबळ – हरिभाऊ राठोड आमनेसामने; 2011 च्या जनगणनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली

हैदराबाद गॅझेटियर आणि ओबीसी सवलतीसंदर्भातील जीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली. सरकारने विद्यमान जीआरमध्ये काही चुका असल्याचे मान्य करून त्यात दुरुस्ती करावी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.

कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरही चर्चा

बैठकीत रक्तातील नाते, नातेसंबंध आणि कुळाच्या नोंदींच्या आधारे चौकशी करण्याच्या प्रक्रियेवरही चर्चा झाली. गावस्तरीय समित्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी करण्यात आली. मराठवाड्यात उपलब्ध नसलेल्या जुन्या नोंदी शोधण्याची आवश्यकता असल्याचे अभ्यासकांनी मांडले.

हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दाही चर्चेत आला. तसेच संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. आता 29 ऑगस्टच्या आंदोलनात जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात आणि सरकारकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Web Title: Manoj jarange patil 29 august maratha reservation protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
1

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
2

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग
3

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

‘खोट्या कागदपत्रांवर जात वैधता प्रमाणपत्र सहन करणार नाही,’ बबनराव तायवाडेंचा जरांगेंना पलटवार
4

‘खोट्या कागदपत्रांवर जात वैधता प्रमाणपत्र सहन करणार नाही,’ बबनराव तायवाडेंचा जरांगेंना पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.