जालना : बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाला एक महिना होऊन गेला असून अद्याप एक आरोपी फरार आहे. इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून वाल्मिक कराडचे नाव आरोपी म्हणून समोर येत असून त्याच्यावर देखील मोक्का लावला आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आक्रमक भूमिका घेत आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून सरकारला घेरले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ आपल्या समाजाचा मोर्चा असल्यामुळे मी समाज म्हणून उद्या छत्रपती संभाजी नगरमध्ये निघणाऱ्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. बांधवांना ही माझी विनंती आहे की, सर्वांनी उद्या त्या मोर्चाला उपस्थित रहा. कारण एका लेकीन हाक दिलेली आहे की, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी मला बळ द्या. पाठिंबा द्या. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हाकेला आपण पाठिंबा द्या. सध्या जो तपास सुरू आहे. पोलीस, सीआयडी आणि एसआयटी असतील त्यामधली सगळी साखळी शोधणं खूप गरजेचं आहे. हे खूप मोठे रॅकेट आहे लहान रॅकेट नाही. खूप मोठ्या गुंडाच्या टोळीचं साम्राज्य उभं केलेलं आहे. त्यामुळे याच्या खोलामध्ये जाणं खूप गरजेचे आहे. कारण हे खूप मोठे कुख्यात गुंड आहेत” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “कारण आतापर्यंत समोर येत नव्हतं किंवा लोक आणत नव्हती. कारण यांची खूप दहशत होती. परंतु आता लोकांच्या मनावर सुद्धा दडपण आणि दहशत गेल्यामुळे हे बाहेर यायला लागलं. त्यामुळे यांचं आता सगळं मुळा गाळा पर्यंत उकरून काढणं गरजेचं आहे. मागील वीस-पंचवीस वर्षापासून लोक खूप अन्याय सहन करत आहेत. त्यामुळे लोकांनी आता व्यक्त व्हायला पाहिजे. पुढे येऊन आपल्यावर झालेला अन्याय सांगायला पाहिजे. बीडच्या एसपींना सांगा, कलेक्टरांना सांगा” असे थेट आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसंबंधीत अपडेट घ्या जाणून
त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी बीड हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की, यामधला एकही आरोपी सुटता कामा नये. कारण हे खूप मोठं षडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे आणि ही सगळी संपली पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की, यामधला एकही आरोपी सुटता कामा नये. कारण हे खूप मोठं षडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे आणि ही सगळी संपली पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत, असे स्पष्ट मत आणि मुख्यमंत्र्यांना कारवाईची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.