दिल्लीत आपला धक्का! या पक्षाला मिळतंय बहुमत, एक्झिट पोलचे अंदाज चक्रावून टाकणारे
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दिल्लीमध्ये तिरंगी लढत होणार असून सर्व देशभरातून निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. केजरीवाल यांचा निवडणुकीचा नामांकन अर्ज रद्द होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षासह भाजप व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यासह आतिशी मार्लेना यांनी जोरदार प्रचार केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करुन अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पूर्ण माहिती दिली नसल्याचा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री प्रवेश शर्मा यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वकील शकीत गुप्ता म्हणाले की, मी प्रवेश शर्माचा प्रतिनिधी आहे. आम्ही रिटर्निंग ऑफिसरकडे अरविंद केजरीवाल यांच्या नामांकन अर्जावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल यांनी 2019 -2020 मध्ये त्यांचे उत्पन्न 1,57,823 रुपये दाखवले आहे, जे दरमहा 13,152 लाख रुपये आहे. हे पूर्णपणे चुकीचे आणि उघड खोटे आहे. विधानसभेच्या कागदपत्रांनुसार, प्रत्येक मुख्यमंत्र्यांना मासिक 20,000 रुपये वेतन आणि 1,000 रुपये दैनिक भत्ता मिळतो.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत बातम्या वाचा एका क्लिकवर
वकील शकीत गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल यांच्या उत्पनाबाबत हा खुलासा केला. याबाबत माहिती देताना शकीत गुप्ता म्हणाले की, केजरीवाल यांनी दिलेली माहिती ही किमान वेतन कायद्याचेही उल्लंघन आहे. हे मतदारांना दिशाभूल करण्याचे काम करत आहे. त्यांनी सांगितले की, प्रभाग ५२ मधील मतदार यादीतील त्यांचा अनुक्रमांक ७०९ आहे. आम्ही तपासले तेव्हा वॉर्ड ५२ मध्ये फक्त १-७०८ पर्यंतचे अनुक्रमांक होते. अरविंद केजरीवाल यांचे मत गाझियाबादमधील कौशांबी येथील वॉर्ड क्रमांक ७२, मतदार क्रमांक ९९१ मध्ये देखील नोंदवले गेले आहे. उत्तर प्रदेशात नोंदणीकृत मतदार दिल्लीत निवडणूक कशी लढवू शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
केजरीवालांविरुद्ध तीन गुन्हे दाखल
वकील शकीत गुप्ता म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना याची जाणीव होती पण तरीही त्यांनी त्यांच्या नामांकन शपथपत्रात ही माहिती लपवली. आरओने अरविंद केजरीवाल यांच्या नामांकनाला स्थगिती दिली आहे. आम्हाला आरओने त्यांचे उमेदवारी अर्ज नाकारावेत अशी आमची इच्छा आहे.
#WATCH | दिल्ली: एडवोकेट शकीत गुप्ता ने कहा, “मैं प्रवेश शर्मा का प्रतिनिधि हूं। हमने रिटर्निंग ऑफिसर (RO) के सामने आपत्ति जारी की है जिसके अनुसार अरविंद केजरीवाल ने 2019-2020 में अपनी आय 1,57,823 रुपये दिखाई है, जो मासिक 13,152 लाख रुपये है। यह पूरी तरह से गलत और सरासर झूठ है।… pic.twitter.com/BkfPea73b3
— ANI_HindiNews (@AHindinews) January 18, 2025
दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दिल्लीत सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. याउलट, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६२ जागा जिंकून वर्चस्व गाजवले, तर भाजपला फक्त आठ जागा मिळाल्या. पुढील महिन्यात ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत निवडणुका होणार आहेत आणि ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.