Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके; धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरु न देण्याची धमकी दिल्याने नवा वाद उफाळला

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड हत्या प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली असून धनंजय मुंडे यांना धमकी दिली आहे. यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 05, 2025 | 12:03 PM
Maratha Manoj Jarange Patil vs OBC Laxman Hake dispute over Devendra fadnavis Criticism

Maratha Manoj Jarange Patil vs OBC Laxman Hake dispute over Devendra fadnavis Criticism

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी हा प्रकार झाल्यानंतर तपासामध्ये दिरंगाई दिसून आली. यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घातले आहे. तसेच जरांगे पाटील यांनी बीडमधील सर्वपक्षीय मूकमोर्चाला उपस्थिती लावली होती. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये नवा वाद सुरु झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत ते संपर्कात आहेत. धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यामध्ये धमकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अशी कोणत्याही प्रकारची धमकी देण्याचा प्रयत्न केला तर मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “मी कुणाचेही नाव घेऊन उगाच बोलत नाही. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आम्ही सहन केला. आतापर्यंत आम्ही कुणाचेही नाव घेतले नाही. पण यापुढे देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आम्हाला माज किंवा मस्ती नाही. पण आमची मुले जर रस्त्यावर येणार असतील तर आमच्यापुढे आता पर्याय नाही,” अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आता मनोज जरांगे पाटील यांच्या धमकीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी मराठा आरक्षणावरुन या दोघांमध्ये मोठा शाब्दिक वादंग झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके असे वाकयुद्ध होताना दिसत आहे. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांना धमकी दिल्यामुळे जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “काळ 200- 250 वर्षांपुर्वीचा नाही, मला वाटतं अशी चितावणीखोर वक्तव्य मनोज जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रमध्ये अराजकता निर्माण होईल. जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही, तुमच्यात जर दम असेल कधी, कुठे, केव्हा, ते सांगा. तो काळ गेला महाराष्ट्रात काट्या कुऱ्हाड्यांचा, आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे,” असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या धमकीवर देखील उत्तर दिले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, “धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरवून द्यायला कोण आहेत ते जरांगे? जरांगे गुंड आहेत? जरांगे कुणी एस पी आहेत? कोण आहेत जरांगे? कायदा यांच्या मालकीचा आहे का? त्यामुळे असल्या चितावणीखोर बोलणं तुमच्या तिकडे कोणालातरी ऐकवा, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या बघितलेल्या आहेत,” अशा कडक शब्दांत लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Web Title: Maratha manoj jarange patil vs obc laxman hake dispute over threat to dhananjay munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Dhnanjay Munde
  • Laxman hake
  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा
1

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा

“हे पवार कुटुंबाने पाळलेले गुंड…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया
2

“हे पवार कुटुंबाने पाळलेले गुंड…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया

Laxman Hake Viral Audio Clip : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली लाच…? दिला ड्रायव्हरचा UPI ID, ऑडिओ होतोय व्हायरल
3

Laxman Hake Viral Audio Clip : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली लाच…? दिला ड्रायव्हरचा UPI ID, ऑडिओ होतोय व्हायरल

OBC नेते लक्ष्मण हाकेंच्या अडचणी वाढल्या; मराठा समाजाबाबतच्या ‘त्या’ व्यक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल
4

OBC नेते लक्ष्मण हाकेंच्या अडचणी वाढल्या; मराठा समाजाबाबतच्या ‘त्या’ व्यक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.