'मला बदनाम करायचं ते करा,पण...'; पालकमंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर धनंजय मुंडेंचा पलटवार
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुतीमध्ये खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराजीचा महापूर आला आहे. त्याचबरोबर बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महायुतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. तपासातील दिरंगाईवरुन महाविकास आघाडीने महायुतीला घेरले होते. यानंतर आता आरोपींना अटक झालेली असलेली तरी देखील मास्टर माईंड वाल्मिक कराड याचा मंत्री धनंजय मुंडे सोबत असणारे संबंध वादग्रस्त ठरत आहे. विरोधकांसह आता महायुतीमधील नेते देखील मंत्री धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावरुन महायुतीमधील अंतर्गत धुसफुस समोर आली आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेल्या संबंधामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दोषींवर क़डक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुडेंनी केली असली तरी देखील केसचा पूर्ण तपास लागेपर्यंत तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडेंकडे बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये असे देखील मत अनेकांनी मांडले आहे. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप आमदार सुरेश धस यांनी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर आता महायुतीमधील शिंदे गटाचे नेते माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गजानन किर्तीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड हत्या प्रकरणावरुन रोष व्यक्त करत मुंडे बंधु भगिनींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गजानन किर्तीकर म्हणाले की, “बीडच्या घटनेनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांना हवं असतं, तर ते अनेक वाल्मिक कराड निर्माण करू शकले असते. पण गोपीनाथ मुंडे असे नेते नव्हते” असं गजानन किर्तीकर म्हणाले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी शिवसेना नेते माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी मागणी केली आहे. त्यामुळे बीड प्रकरणामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये देखील धनंजय मुंडे विरोधात प्रतिकुल परिस्थिती आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता एक महिना होत आला आहे. तरी देखील आरोपींना अटक करण्यात येत नव्हते म्हणून राज्य भरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. यानंतर मास्टर माईंड असलेला वाल्मिक कराड याने 20 दिवसांनंतर पुण्यामध्ये सरेंडर केले. त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना पळून जायला मदत करणाऱ्या डॉ संभाजी वायबसे याला अटक झाली. वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना बसवराज तेली यांच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.