Minister Aditi Tatkare said when the May installment of Ladki Bahin Yojana will give
मुंबई : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पात्र महिलांना या योजनेंतर्गत प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जातात. मात्र यामध्ये अनेक योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलांनी देखील अर्ज दाखल केल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे. तसेच अद्याप मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये दाखल झालेला नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
जून महिना सुरु झाला असला तरी देखील मे महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. लाखो महिलांचे लक्ष हे या हप्त्याकडे लागलेलं असतानाच आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या मोठी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणीला कधी हप्ता मिळणार याबाबतचं मत मांडताना आदिती तटकरे यांनी आश्वासन दिले आहे. लवकरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच लाडक्या बहीण योजनेमध्ये सरकारी नोकरी असणाऱ्या महिलांनी देखील अर्ज दाखल केले. त्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालू राहणार आहे. चार महिन्यापूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की, सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत. तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, असं सांगतानाच लाडक्या बहिणींना मे महिन्यांचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. यावरुन महिला आयोगाला लक्ष्य केले जात आहे. महिलांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महिला आयोगाने तप्तर रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बैठक देखील घेण्यात आली आहे. यावर मत मांडताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आज महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेणारी बैठक सुरू होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आले नाही. बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू. काही बदल करण्याच्या सूचना आल्या तर त्या अंमलात आणू. महायुतीतून कुणी वैयक्तिक टीका केलेली नाही. महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. सूचनांचा विचार नक्की करू, असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.