
Maharashtra Politics: "उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस..."; 'या' नेत्याने 'उबाठा'चं सगळंच बाहेर काढलं
उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी फरक पडणार नाही
योगेश कदमांची ठाकरेंवर जहरी टीका
खेड: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, गृहमंत्री योगेश कदम यांनी या घडामोडींवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, त्यांची युती झाली तरी त्यामुळे मुंबईकरांचे गेल्या २५ वर्षात झालेले नुकसान भरून निघणार नाही.
मुंबईकरांच्या जीवनात काहीही बदल होणार नाही. पंचवीस वर्षे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्याकडे असतानाही मराठी माणसाचे काय भले झाले? मराठी माणूस मात्र हळूहळू मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्यांनी सत्तेत असतानाही मराठी माणसासाठी ठोस निर्णय घेतला नाही. त्यांच्याकडून आता काय अपेक्षा ठेवावी?, असा सवाल गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केला. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे मिळूनही उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेच्या हिताचे एकही धोरण अमलात आणले नाही.
नेत्यांवर मुंबईकर पुन्हा विश्वास ठेवणार नाहीत
मराठी माणसाच्या भावनांचा विचार करण्याऐवजी त्यांनी फक्त सत्तेचा उपभोग घेतला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत म्हटले की, फसवे आणि दिखाऊ राजकारण करणाऱ्या या नेत्यांवर मुंबईकर पुन्हा विश्वास ठेवणार
नाहीत. मराठी माणूस आता जागा झाला आहे आणि तो विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देईल. कदम यांच्या या वक्तव्यामुळे महानगरपालिका आगामी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Mahavikas Aghadi Rally: ‘ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई…’; महाविकास आघाडीसह ठाकरे बंधू मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार
शिवतर कोडबा धरणाचा जलपूजन समारंभ
विकास कामांच्या पार्श्वभूमीवर खेड आणि दापोली येथे आले असता गृहराज्यमंत्री योगेश कदम माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील सर्वांत कमी वेळात बांधण्यात आलेल्या धरणांपैकी एक म्हणून शिवतर कोडबा धरणाची नोंद होणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे जलपूजन आज पारंपरिक पद्धतीने साडी, चोळी आणि नारळ अर्पण करून गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. चार वर्षांपूर्वी शिवतर, कोडबा, जामगे आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या धरणाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर विक्रमी वेगाने काम पूर्ण करत आज जलपूजनाचा सोहळा पार पडला.