Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Politics : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच डी. के. शिवकुमार यांना पुन्हा झटका; मंत्र्यांची थेट दिल्लीत धाव

कृष्णा बायरे गौडा यांना बंगळुरू विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, परंतु त्यांनी अजूनही आपला पदभार स्वीकारलेला नाही. सूत्रांनुसार, गौडा यांना केवळ 'ग्रेटर बंगळुरू डेव्हलपमेंट' विभाग देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 09:33 AM
Karnataka Politics : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच डी. के. शिवकुमार यांना पहिला झटका; मंत्र्यांची थेट दिल्लीत धाव

Karnataka Politics : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच डी. के. शिवकुमार यांना पहिला झटका; मंत्र्यांची थेट दिल्लीत धाव

Follow Us
Follow Us:

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्तासंघर्षांनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यात यश आलेले डी. के. शिवकुमार यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांचे अनेक मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यांवरून असंतुष्ट असून, रामलिंगारेड्डी यांच्यानंतर आता मंत्री कृष्णा बायरे गौडा हे देखील आपली तक्रार घेऊन काँग्रेस हायकमंडला भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

कृष्णा बायरे गौडा यांना बंगळुरू विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, परंतु त्यांनी अजूनही आपला पदभार स्वीकारलेला नाही. सूत्रांनुसार, गौडा यांना केवळ ‘ग्रेटर बंगळुरू डेव्हलपमेंट’ विभाग देण्यात आला आहे. तर बंगळुरू डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि बंगळुरू मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणा मुख्यमंत्री शिवकुमार यांनी स्वतःकडेच ठेवल्या आहेत. यामुळे गौडा नाराज आहेत.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये मोठी घडामोड, शपथविधीनंतर 2 दिवसांतच मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा राजीनामा

विशेष म्हणजे, याच खात्यावरून यापूर्वी रामलिंगारेड्डी नाराज झाले होते. आपल्याला हे खाते देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नंतर ते कृष्णा बायरे गौडा यांना देऊन आपल्याकडे केवळ सिंचन मंत्रालय सोपवण्यात आले, असा आरोप रामलिंगारेड्डी यांनी केला होता.

दरम्यान, आमदार रिझवान अर्शद हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. रिझवान हे शिवकुमार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात सध्या २१ पदे रिक्त आहेत आणि याच रिक्त जागांपैकी एका पदावर आपला दावा ठोकण्यासाठी रिझवान दिल्लीत पोहोचले आहेत.

के. एच. मुनियप्पांनाही मिळाले नाही आवडीचे खाते

आणखी एक ज्येष्ठ मंत्री के. एच. मुनियप्पा हे देखील त्यांना मिळालेल्या मंत्रालयावर खूश नाहीत. मुनियप्पा यांच्याकडे’ अन्न आणि नागरी पुरवठा’ विभाग सोपवण्यात आला आहे. मात्र, पक्षातील अत्यंत ज्येष्ठ नेते असल्याने आपण यापेक्षा चांगल्या आणि मोठ्या खात्यासाठी पात्र होतो, असे मुनियप्पा यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या दोन दिवसांत झटका

मुख्यमंत्रिपदाच्या दोनच दिवसात कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळाल्या. त्यात शपथविधीनंतर दोन दिवसांतच मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. मंत्रिपदाच्या वाटपावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नाराजीचा पहिला फटका बसला असून, रामलिंगा रेड्डी यांनी खातेवाटपाबाबत नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.

Web Title: Ministers express strong displeasure with shivkumar over his ministerial post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • dk shivkumar
  • Karnataka Politics
  • Latest Political News

संबंधित बातम्या

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा
1

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.