MLA Jitendra Awhad angry over Mumbra local accident Mumbai local news
मुंबई : मुंबईत दोन लोकल ट्रेनमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला. कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. चालू लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये 13 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडणीने रुग्णालयात दाखल आले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन जखमींना दिलासा दिला आहे. यानंतर रेल्वे अपघातानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया द्वारे पोस्ट करुन मागणी देखील केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, “धावत्या रेल्वेगाडीतून पडून झालेले मृत्यू हे वेदनादायक आहेत. लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेतील प्रवास हा नेहमीच जीवघेणा असतो. रेल्वेचा न सुधारण्याचा अट्टाहास हा अनेकांचा जीव घेऊन जातोय,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “लोकलच्या प्रवाशांनी अनेकवेळा मागणी केली आहे की, दिवा टर्मिनेटिव लोकल ट्रेन सुरू करावी. गेल्या दशकात दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील लोकसंख्या हजार पटीने वाढली आहे. मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या हजार पटीने वाढली आहे. लोकल ट्रेनच्या फेऱ्या प्रवाशीसंख्येच्या तुलनेत वाढल्यात का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. भारतातील सर्वात जास्त महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो. रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे ऐकायलाही योग्य वाटत नाही. रेल्वेने काहीतरी उपाययोजना कराव्यात, एवढीच सर्व प्रवाशांची मागणी आहे. दिवा टर्मिनेटींग लोकल ट्रेन हा त्यावरील एक छोटासा उपाय आहे,’ असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपाय सुचवले आहेत.
धावत्या रेल्वेगाडीतून पडून झालेले मृत्यू हे वेदनादायक आहेत. लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेतील प्रवास हा नेहमीच जीवघेणा असतो. रेल्वेचा न सुधारण्याचा अट्टाहास हा अनेकांचा जीव घेऊन जातोय. प्रवाशांनी अनेकवेळा मागणी केली आहे की, दिवा टर्मिनेटिव लोकल ट्रेन सुरू करावी. गेल्या दशकात…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 9, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“अपघात झाल्यानंतर आणि प्रवाशांचा जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. त्यांनी ऑटोमॅटिक पद्धतीने लोकलची दारे यापुढे बंद होतील अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी नियमित लोकलला अशा पद्धतीचे दरवाजे शक्य नाही. लोक गुदमरतील, श्वास घेता येणार नाही. अपघातानंतर उगाच काहीतरी विनोदास्पद भाष्य करण्यामध्ये काहीही अर्थ नाही,” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत.