
MNS Avinash Jadhav shared video of police taking a candidate to DCM Eknath Shind in Thane
Avinash Jadhav : मुंबई : राज्यातील 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी केलेल्या अथक प्रयत्नांवरही टीका करण्यात आली. त्याचबरोबर अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याने चिंता देखील व्यक्त करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातून 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यानंतर आता ठाकरे गटाच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंकडे घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
ठाण्यामध्ये अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून येत असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये आता ठाकरे गटाचा आणखी एका उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे घेऊन जात आहेत. चकक् पोलीसच उमेदवाराला एकनाथ शिंदेंकडे घेऊन जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
हे देखील वाचा : “फडणवीसांचं त्यांच्या पक्षातसुद्धा त्यांचं कोणी ऐकत नाही…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर संताप
उमेदवाराचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अविनाश जाधव म्हणाले की, निवडणुक आयोग म्हणत आम्ही चौकशी करू. पण फक्त चौकशी करून होणार नाही कारण ज्या आरो आहेत त्यांचा अगोदर पासून यात सहभाग आहे. खरंच न्याय द्यायचा असेल तर एका संस्थेकडून चौकशी व्हावी, या संपूर्ण निकाल राखून ठेवायला हवं. असे निकाल लागत गेले तर या अगोदर मतदार विकत घेतला जात होता आता उमेदवार विकत घेतला जातोय, असा घणाघात अविनाश जाधव यांनी केला.
…तर महाराष्ट्र बदनाम होईल
पुढे ते म्हणाले की, आमच्याकडे बरेचसे पुरावे आहेत एका केसमध्ये आरोनी केलेला घोळ आहे. आम्ही आज आवाज उठवला नाही तर महाराष्ट्र बदनाम होईल. शेवटचा मार्ग कोर्ट आहे. न्याय मागायला आम्ही गेलोच नाही असं व्हायला नको म्हणून आम्ही कोर्टात आलोय. निवडणुकीत काम करणारी माणसं ही आमदार, नगरसेवक यांच्या संपर्कतील असतात ही खालची लोक या लोकांना मदत करतात. असीम सरोदे सर आमचे वकील आहेत ते पुढची प्रोसेस पाहतील, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा
अविनाश जाधव म्हणाले की, व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या घरी चालत चालला आहे. त्याच्यासोबत पोलीस आहे. तो कशासाठी गेला होता? पैशाच्या गंगेत अंघोळ करायला गेला होता का? तिकडून निघून त्याने डायरेक्त अर्ज मागे घेतला, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.