एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुंबईच्या महापौर मुस्लीम महिला होणार असल्याचा दावा केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर 16 तारखेला निकाल देखील हाती येणार आहे. यामध्ये मुंबईकर कोणाच्या हाती कौल देणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबई महापौर कोण होणार यावरुन वाद निर्माण झाला आहे. महापौर मराठीच झाला पाहिजे अशी मागणी शिवसेना-मनसेकडून केली जात आहे. तर हिंदू महापौर भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. यावरुन आता आणखी वाद चिघळला आहे. एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला जोरदार प्रतिउत्तर देत थेट मोठा दावा केला आहे. आता वारिस पठाण यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत असून दुसऱ्या मोठ्या वादाला तोंड फुटले.
हे देखील वाचा : दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा
काय म्हणाले वारिस पठाण?
अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौर पदाबाबत वारिस पठाण यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, “जर मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतो, तर मग एक मुस्लिम महिला महापौर का नाही होऊ शकत? धारावीतील एका सभेला संबोधित करताना वारिस पठाण म्हणाले की, हे विधान संविधान आणि लोकशाही या दोन्हींच्या विरोधात आहे. आमचे एक स्वप्न आहे की, एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल,” अशी इच्छा वारिस पठाण यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांसोबत डील झाल्याचा बड्या नेत्याचा दावा
पुढे ते म्हणाले की, “मला एक सांगा की, मी महादेवावर प्रेम करतो, असे वक्तव्य करणारी व्यक्ती जर महापौर होऊ शकते तर मग हिजाब घालणारी आणि कलमा पठण करणारी मुस्लिम महिला का महापौर होऊ शकत नाही?” असा प्रश्न एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या राजकारणामध्ये आधीच महापौरवरुन वाद निर्माण झालेला असताना आणि भाजप व शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरु असताना वारिस पठाण यांनी वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.






