Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कागदी घोडे नाचवण्यात हुशार…छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे प्रयत्न; राज ठाकरेंनी थेट मुख्यध्यापकांनाच लिहिले पत्र

शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य नसली तरी इच्छुक ठेवण्यात आली आहे. यावरुन मनसे नेते राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 18, 2025 | 01:47 PM
mns raj thackeray on letter for all school principals for hindi Language in Maharashtra

mns raj thackeray on letter for all school principals for hindi Language in Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठी विरुदध हिंदी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्ती नसली तरी इच्छुक विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असल्याचे देखील जाहीर केले आहे. यावरुन आता मनसे नेते राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर यासंबंधी त्यांनी शाळांच्या सर्व मुख्यध्यापकांना उद्देशून पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर राज्य सरकारकरुन हिंदी भाषा शाळेमध्ये शिकवण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. त्याचबरोबर पत्र देखील पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र, एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झालं. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल.”

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे, म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या काय देणंघेणं त्याच्याशी.”

सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग

“पण महाराष्ट्रात जेंव्हा अशी सक्ती आली तेंव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहणार. पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. बरं याचा लेखी आदेश अजून आला आहे का ? तसा तो कुठे आला असेल तरी आम्हाला तो दिसला नाही. कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार हा कागद पण नाचवून दाखवेल. मग आमचा प्रश्न आहे मग तिसरी भाषाच मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरु आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय. याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका.”

महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र, एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि… pic.twitter.com/6UokP2N0QA — Raj Thackeray (@RajThackeray) June 18, 2025

“मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं ,अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका.”

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.”

बाकी आपण सुज्ञ

“या विषयांत जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचं लेखी पत्र हवं असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की…महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे ! बाकी आपण सुज्ञ आहातच ! अधिक काय लिहीणे !”

Web Title: Mns raj thackeray on letter for all school principals for hindi language in maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • Hindi Language
  • Marathi language Compulsory
  • raj thackeray

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?
2

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
3

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?
4

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.