उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक खासदार शरद पवार यांना भेटले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर पालिका व जिल्हापरिषदेवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्व पक्ष स्थानिक पातळीवर काम करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन्ही गट देखील एक्शनमोडमध्ये आले आहेत. अजित पवार व शरद पवार गट यांचा कार्यकर्ता मेळावा देखील काल (दि.17) पार पडला. यानंतर आज अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत युतीच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. यानंतर देखील झालेली ही भेट चर्चेस कारण ठरली आहे. आज माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकी संदर्भात शरद पवारांनी सभासदांशी संवाद साधला. त्यानंतर माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या भेटीबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. तसेच माळेगाव सहकारी कारखान्यामध्ये अजित पवार यांचे पॅनेल विरुद्ध शरद पवार पॅनेल अशी थेट लढत आहे. ते म्हणाले की, टोकाची भूमिका घेण्याची आपली इच्छा नाही. पण पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा पहावी लागते” असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं.
संधी साधूपणाचं राजकारण
शरद पवार म्हणाले की, “कुणी तरी आता म्हणालं सर्वांना बरोबर घ्या. सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही. पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांनासोबत घेणं मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहीत करायचं नाही. त्यादृष्टीने पावलं टाकायचं आहे. आम्ही संधीसाधूंसोबत जाणार नाही” अशा स्पष्ट शब्दांत शरद पवार यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत जाणार नसल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीबाबत मत मांडले आहे. त्या म्हणाल्या की, आपल्या शेतकरी वर्गाला एक रुपया टॅक्स भरावा लागता कामा नये. शेतकऱ्याला टॅक्स नसावा. वन नेशन वन इलेक्शन या कमिटीत देखील मी आहे. सर्व निवडणूक पारदर्शक आणि गुण्यागोविंदाने झाली पाहिजे. माळेगाव निवडणुकीत युगेंद्र पवार आणि कार्यकर्ते देखील प्रचारात मेहनत घेत आहेत. माळेगाव कारखान्याची मी देखील सभासद आहे. माळेगाव कारखाना बिनविरोध व्हावा अशी माझी इच्छा होती. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी लाखो रुपये कमवितो आहे याचा मला अभिमान आहे” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.