Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आहे’ या वक्तव्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे सचिन पोपळे यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधत मीरा-भाईंदर हे आगरी-कोळी आणि मराठी माणसांचे शहर असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2026 | 01:09 PM
रा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा, म्हणाले- ‘हे शहर आगरी-कोळी मराठी माणसांचे’

रा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा, म्हणाले- ‘हे शहर आगरी-कोळी मराठी माणसांचे’

Follow Us
Follow Us:
  • ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक
  • सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
  • ‘हे शहर आगरी-कोळी मराठी माणसांचे’
विजय काते, मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी असल्याचा दावा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाण्यातील ‘दर्शन सागर सन्मान २०२६’ सोहळ्यात केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मेहता यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन वसंत पोपळे यांनी मेहतांवर जोरदार टीका केली आहे.(Mira Bhayandar News)

ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मेहता यांनी जैन समाजाच्या धार्मिक प्रथांवरून राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. मीरा-भाईंदरमध्येही अशाच प्रकारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र आपण तो हाणून पाडल्याचे त्यांनी सांगितले. “माझा जन्म जैन धर्मात झाला याचा मला अभिमान आहे. जैन धर्मावर जेव्हा-जेव्हा अडचण येईल, तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन,” अशी भूमिका मेहता यांनी मांडली.

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना

यावेळी त्यांनी मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी असल्याचा उल्लेख करताना आमदार आणि महापौर दोघेही जैन असल्याचे सांगितले. तसेच मीरा-भाईंदरमध्ये प्रस्तावित ५० कोटी रुपयांच्या कत्तलखान्याचा नकाशा महापालिकेत सत्ता आल्यानंतर नामंजूर केल्याचा दावाही त्यांनी केला.

मेहता यांच्या या वक्तव्यावर मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी आक्षेप घेतला आहे. “मीरा-भाईंदर शहर जैनांची नगरी नसून आगरी-कोळी आणि मराठी माणसांचे शहर आहे,” असे पोपळे यांनी म्हटले आहे. मेहता यांच्या वक्तव्यामुळे मराठी-अमराठी, गुजराती आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शहराची ओळख कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित करता येणार नाही, अशी भूमिका मांडत पोपळे यांनी मेहतांना इशारा दिला. धार्मिक किंवा भाषिक आधारावर शहरात दुही निर्माण करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, मेहता यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Web Title: Mns sachin pople targets narendra mehta over mira bhayandar jain city statement sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था
1

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना
2

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
3

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
4

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.