Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं मोठं विधान

ज्येष्ठ नेते काम करत असताना शासकीय दरबारी सरपंचालाही मान होता. मात्र, सध्या सोलापूर जिल्ह्याला आपला जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने विविध कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 20, 2025 | 12:30 PM
सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं मोठं विधान

सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यांची फळी होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात काम केले जात होते. ज्येष्ठ नेत्यांनी सहकारातून जिल्ह्याचा विकास केला होता; मात्र सध्या जिल्ह्याला आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने प्रशासकीय व सहकाराची घडी विस्कटली असल्याची खंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कासेगाव येथील वसंत नाना देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे वसंत नाना यांचा कासेगाव येथे ग्रामस्थ वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी नेते अनिल सावंत व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार मोहिते पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील, दिगंबर बागल, कै. गणपतराव देशमुख, सुधाकरपंत परिचारक तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, दिलीप सोपल, लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासारखे दिग्गज नेते यांनी सोलापूर जिल्ह्यात चांगल्याप्रकारे विकास केला होता. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी त्यांनी सहकार चळवळ उभी केली. या माध्यमातून साखर कारखाने दूध संस्था उभ्या केल्या. यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.

ज्येष्ठ नेते काम करत असताना शासकीय दरबारी सरपंचालाही मान होता. मात्र, सध्या सोलापूर जिल्ह्याला आपला जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने विविध कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासकीय व सहकारातील घडी विस्कटली आहे. सरपंचाला मान मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर ठेकेदार मालामाल झाले असून त्यांच्या इशाराने अधिकारी काम करत असल्याचे पहावयास मिळत आहे. एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय सहकाराची घडी विस्कटली असल्यामुळे खासदार मोहिते पाटील यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी कासेगाव ग्रामपंचायततर्फे प्रत्येक घरात कलमी आंब्याचे एक झाड, दोन कचराकुंडी तसेच गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आली. यावेळी नागेश फाटे, अनिल सावंत, अमर पाटील, दीपक वाडदेकर, सुरेश कट्टे यांच्यासह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातून राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व कासेगावमधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mp dhairyasheel mohite patil talked about solapur politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Dhairyasheel Patil
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

जिल्हा परिषद-पंचायत समितीमध्येही ‘महापालिका पॅटर्न’; मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध
1

जिल्हा परिषद-पंचायत समितीमध्येही ‘महापालिका पॅटर्न’; मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत
2

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत

Karjat News : कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाची भाजप आणि शेकाप बरोबर महायुती; महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
3

Karjat News : कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाची भाजप आणि शेकाप बरोबर महायुती; महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका
4

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.