Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Session 2025 :AI द्वारे हिंदू देव – देवतांचे डीपफेक तयार केले तर…; संसदेत खासदार मेधा कुलकर्णी धडाडल्या

Medha Kulkarni in winter session 2025 : सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 05, 2025 | 06:49 PM
MP Medha Kulkarni demands action in AI defacement of Hindu gods in Parliament Winter Session 2025

MP Medha Kulkarni demands action in AI defacement of Hindu gods in Parliament Winter Session 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यसभेमध्ये मेधा कुलकर्णी आक्रमक
  • हिंदू देव देवतांच्या AI वापरुन अपमान होत असल्याचा आरोप
  • सरकारकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Medha Kulkarni in winter session 2025 : नवी दिल्ली : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेते राज्यातील अनेक समस्या मांडत आहेत. यामध्ये आता पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदू देव देवतांचा अपमान करण्याबाबत मुद्दा मांडला. हिंदू देव-देवतांचे एआय-आधारित डीपफेक आणि अश्लील स्वरूपातील चित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. ही गोष्ट अतिशय संतापजनक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली.

खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि मनस्ताप देणारे असल्याचे सांगत त्यांनी यामागे जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असल्याचा आरोप केला.

हे देखील वाचा : राज्यातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात; भाजपच्या नेत्याची कबुली, चर्चांना उधाण

सभागृहामध्ये डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, अलीकडच्या काही महिन्यांत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर एआय-जनरेटेड, मॉर्फ्ड आणि डीपफेक अश्लील चित्रांचा मोठा प्रसार होताना दिसून येत आहे. हिंदू देवतांचे चित्रण खास करून लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रगत एआय-तंत्रज्ञान, डीपफेक टूल्स आणि इमेज मॅनिप्युलेशनच्या दुरुपयोगामुळे सायबर गुन्ह्याचा नवा धोका निर्माण झाला असून, पवित्र प्रतिमा विकृत करून मुक्तपणे प्रसारित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : ‘यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

सध्याच्या कायदेशीर चौकटीत या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी कडक व्यवस्था नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या कृत्यांच्या पद्धतशीर आणि हेतुपुरस्सर स्वरूपावरून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारने या प्रकारातील दोषींवर कठोर आणि आदर्श कारवाई करावी, सोशल मीडिया कंपन्यांना एआय-आधारित शोधयंत्रणा, तत्काळ ‘टेकडाऊन’ प्रणाली आणि संवेदनशील सामग्रीसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया अनिवार्य कराव्यात, अशी मागणी केली. यासोबतच, ‘हिंदू फेथ प्रोटेक्शन लॉ’ किंवा ‘अँटी-ब्लास्फेमी लॉ’ सारखा सर्वंकष कायदा करण्याची गरज अधोरेखित करत, एआय-आधारित धार्मिक बदनामी थांबवता येईल, असे मत राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मेधा कुलकर्णी यांनी इशारा दिला की योग्य पातळीवर तातडीची कारवाई झाली नाही, तर डीपफेक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा धोका वाढू शकतो. याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Mp medha kulkarni demands action in ai defacement of hindu gods in parliament winter session 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • Hindu
  • Medha Kulkarni
  • parliament winter session 2025

संबंधित बातम्या

Parliament Winter Session: उच्च न्यायालयात ‘RSSचे न्यायाधीश’; DMK खासदाराच्या टिकेवरून लोकसभेत राडा
1

Parliament Winter Session: उच्च न्यायालयात ‘RSSचे न्यायाधीश’; DMK खासदाराच्या टिकेवरून लोकसभेत राडा

Tobacco Tax Explained: भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा
2

Tobacco Tax Explained: भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा

Sahara Refund Update: सहारा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! 3.54 दशलक्ष गुंतवणूकदारांना 6,842 कोटी परत? अमित शहांची माहिती
3

Sahara Refund Update: सहारा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! 3.54 दशलक्ष गुंतवणूकदारांना 6,842 कोटी परत? अमित शहांची माहिती

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राडा; विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’ची नारेबाजी
4

Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राडा; विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’ची नारेबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.