महायुती सरकारला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त मंगल प्रभात लोढा यांनी भाजप सरकारचे कौतुक केले (फोटो - सोशल मीडिया)
महायुती सरकारला राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झालेल्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होऊन वर्षपूर्ती झाली आहे. यानिमित्त भाजपने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच चित्रकार भरत सिंह यांनी फडणवीस यांच्या 2014 पर्यंतच्या कार्याचा आढावा चित्रामध्ये रेखाटला. या चित्राचे प्रदर्शन मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे करण्यात आले. या उद्धाघटनावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सर्व पक्ष चालवत असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा: महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला
मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सर्वांचे राजकीय गुरू झाले आहेत. त्यांची विभिन्न रुपे आम्ही या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहत आहोत. मी २५ वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विधानसभेत बसत आहे. फडणवीस राजकीय नेते म्हणून कसे आहेत? हे सर्वांना माहीत आहेच पण ते व्यक्ती म्हणून कसे आहेत, हे मी सांगतो. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते कुटुंबातील सदस्य समजतात. एरवी तुमच्या मेसेजला रिप्लाय मिळो या ना मिळो. पाण तुमच्या घरात जर एखादी समस्या उद्भवली तर ते मदतीसाठी पुढे येतातच.” असे मंगल प्रभात लोढा म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान
दरम्यान महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशः आभार मानतो. आमच्या २३२ जागा निवडून आल्या आज आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षात आम्ही महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला.






