
MP Sanjay Raut Live criticizes the BJP and MIM alliance in Akola maharashtra Politics
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून संयुक्त पत्रकार परिषदेबबाबत मत व्यक्त केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, संयुक्त मुलाखतीला पत्रकारांना बसवलं होत, दोन धुरंदर एकत्र आले, मुलखात देणारे आणि घेणारे, ती महाराष्ट्राची मुलाखत आहे. महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडले, ज्या समस्या आहेत ते प्रश्नावर त्यांनी मत व्यक्त केली. त्यांनी सांगितलं आता नाहीतर कधी नाही, मुंबई हातून गेली तर पुन्हा येणार नाही. मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाची डेथ वॉरंट काढलं जातंय, फडणवीस राज्य वाऱ्यावर सोडून फिरत आहेत, अजित दादा, शिंदेने राज्य वाऱ्यावर सोडले, अजित दादा भाजपवर टीका करतात तरीही सरकारमध्ये आहेत. अजित पवार सावरकरांना मानत नाहीत, ते त्यांच्या मनात नाही तर सरकारमधून त्यांना दूर करा, असा आक्रमक पवित्रा खासदार राऊत यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंसोबतची युती राज ठाकरेंना महागात? आणखी एका जवळच्या नेत्याने सोडली साथ
राज्यामध्ये अनेक ठिकाणी विचित्र युती झाल्याचे चित्र दिसले आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेत नेत्यांनी ही युती केली आहे. याबाबत टीका केली जात आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपने जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती संधीसाधू असल्याचे देखील भाजप नेत्यांनी म्हटले आहे. मात्र भाजपने अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क ‘एमआयएम’सोबत (MIM) आघाडी केली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपने MIM ला पाठिंबा दिला, अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. तर अकोल्यामध्ये MIM ला पाठिंबा दिला. ओवेसी काँग्रेससोबत चुंबा चिंबी सुरु आहे, हे दुतोंडी गांडुळ आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी उघड युती, कुठे छूपी युती आहे. त्यांना काँग्रेमुक्त भारत करायचं होत, पण ते युती करत आहेत. मी काँग्रेसलाही बोलतोय मात्र भाजपचे आश्चर्य आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर
पुढे राऊत म्हणाले की, राज्यामध्ये भाजप ब्लॅकमेलच राजकारण सुरू ठेवलं आहे. शिंदेच्या लोकांना ब्लॅकमेल केलं जातंय, अशोक चव्हाण ला ब्लॅकमेल केलं जातंय. तुम्ही ब्लॅकमेलर आणि गँगर आहे. यांना सावकारांचे विचार नाहीत, असा घणाघात देखील खासदार राऊत यांनी केला आहे.