Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी १७८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप खासदार राऊत यांनी ‘सामना’मधून केला होता. मंत्री दादा भुसे यांनी आरोप फेटाळून लावत बदनामीचा खटला दाखल केला होता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 01:37 PM
खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, 'भाजपच्या राजकारणाला एकच शब्द...'

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, 'भाजपच्या राजकारणाला एकच शब्द...'

Follow Us
Follow Us:
  • १७८ कोटींच्या आरोपांचं नेमकं प्रकरण काय?
  • मंत्री दादा भुसे यांनी राऊतांविरोधातील खटला घेतला मागे
  • चुकीच्या माहितीच्या आधारे राऊतांनी केलेले आरोप?
Sanjay Raut 178 Crore Allegation : १७८ कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याच्या आरोपांवरून रंगलेल्या राजकीय संघर्षाला अखेर न्यायालयीन मंचावर वळण निर्णायक मिळाले. शनिवारी (दि.२१) मालेगाव न्यायालयात हजर राहून खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. तर मंत्री दादा भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेत समझोत्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या या प्रकरणाची नाट्यमय सांगता झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील 105 ग्रामपंचायतींची मुदत संपली; गावागावांत आखाडे रंगायला सुरुवात

१७८ कोटींच्या आरोपांचं नेमकं प्रकरण काय होतं?

दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी खा. राऊत यांनी दैनिक ‘सामना’ मधून २२ जून २०२३ रोजी ‘मंत्री दादा भुसेंकडून १७८ कोटींची फसवणूक, संजय राऊत यांची एडीकडे तक्रार; आता कारवाईची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यातून त्यांनी मंत्री भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अवसायनात निघालेल्या या कारखान्याची सुमारे १५ वर्षांपूर्वी विक्री झाली होती. मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित कंपनीने सुमारे २७ कोटी १५ लाख रुपयांना हा कारखाना खरेदी केल्याचा व्यवहार झाला होता. मात्र, कारखाना खरेदीच्या नावाखाली मालेगाव व परिसरातील नागरिकांकडून भागभांडवल गोळा करून जवळपास १७८ कोटी रुपये हडप केल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला होता. या आरोपांमुळे मालेगावसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

मंत्री दादा भुसे यांची भूमिका आणि खटला काय?

मंत्री दादा भुसे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. ‘जर १७८ कोटी रुपये जमा झाले असते, तर कारखाना आपणच खरेदी केला नसता का?’ असा सवाल भुसे यांनी उपस्थित केला होता. सुमारे दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचेच भागभांडवल जमा झाले असून ती रक्कम बैंक आरटीजीएसद्वारे संबंधित कपनीत गुंतवली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भागधारकांना सर्व व्यवहाराची माहिती असल्याचाही भुसे यांनी दावा केला. आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत मंत्री भुसे यांनी भारतीय दंड विधान कलम ५०० अन्वये मालेगाव न्यायालयात अॅड. सुधीर अक्कर यांच्यामार्फत गुन्हा क्रमांक १९४३ नुसार बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता.

राऊतांना कोणी दिलेली माहिती?

न्यायालयात हजर होत राऊत यांनी स्पष्ट केले की, अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण आरोप केले होते. मात्र, त्या माहितीत तथ्य नसल्याचे समजल्याने आपण सर्व आरोप मागे घेत असून दिलगिरी व्यक्त करत आहोत. खासदार राऊत यांनी न्यायालयात तसेच माध्यमांशी बोलताना गिरणा कारखान्याचे सभासद व शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल खेद व्यक्त केला. तसेच सभासदांची सत्य बाजू ‘सामना’त प्रसिद्ध करण्यासही त्यांनी मान्यता दिली. १२ जानेवारी रोजी तक्रारदार मंत्री भुसे यांची साक्ष नोंदवण्यात आली. पुढील तारखेला उलटतपासणी होणे अपेक्षित होते, मात्र २२ जानेवारी रोजी सुनावणीदरम्यान खासदार राऊत व त्यांचे क्कील गैरहजर राहिल्याने न्यायालयाने खासदार राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम साक्षीदार सुनील देवरे यांना खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

Web Title: Sanjay raut dada bhuse 178 crore allegation controversy dramatic end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Court
  • dada bhuse
  • Eknath shinde Shivsena
  • sanjay raut
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप
1

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा
2

Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा

Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश
3

Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार
4

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.