mp sanjay raut on manoj jarange patil maratha reservation aandolan in mumbai
Thackeray Group on Jarange Patil : मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे लाखो मराठा समर्थक आणि बांधवांसह मुंबईमध्ये येणार आहेत. यामुळे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे असे सत्ताधारी नेत्यांकडून विचारले जात आहे. खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाबाबत शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मांडली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत मराठा आंदोलनाबाबत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत त्यांच्या मागण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्याने माहिती द्यायची गरज नाही. विधानसभा निवडणुकी आधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पुन्हा सरकार आलेल आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा, यापेक्षा जास्त मी बोलणार नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, मुंबई हे मराठी माणसाचे आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार मुंबई येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये हे आमचे सगळ्यांची भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देत, तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणीही असो, कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं या मुंबई शहरात मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यासाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत, ही राजधानी मराठी माणसाची आहे, तर अशाप्रकारे त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधने गरजेचे आहे आणि ऐन गणपतीमध्ये मुंबई कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.
सत्ता मिळवण्यासाठी फडणवीसांनी जातीचे राजकारण केलं
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण आम्ही करत नाही, राजकारण जे आहे जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या दहा वर्षात जास्त झालं तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील, आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील, जाती जातीचे तुकडे पाडायचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या केली. मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये आणि सत्ता मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं, असा आरोप खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाही तर डोनाल्ड ट्रम्पकडे मागणी करणार का?
आज जाती-जातीमध्ये आगी लागलेल्या आहेत, असं चित्र कधी नव्हतं, हे या राज्याचं दुर्दैव आहे. रोज कुठे ना कुठेतरी जात विरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी येते. आमच्यासारख्या ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं त्यांच्यासाठी वेदनादायक आहे. मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते त्यांच्या पाठी प्रचंड प्रमाणात समाज आहे. या त्यांच्या समाजाच्या काही मागण्या आहेत. रोजगारा संदर्भात आर्थिक अडचणी संदर्भात ते सरकारकडे मागणी करणार… ते प्रेसिडेंट ट्रम्प किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाही. हे नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार. उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल किंवा दुसरा मुख्यमंत्र्यांकडे त्याच्याकडे मागण्या मागतील, व्यक्तीकडे मागत नाही तुम्ही त्यांचे पालक आहात तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईकडे आले आहेत तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.