MP Sanjay Raut on Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance for mumbai elections 2025
Sanjay Raut Live : मुंबई : राजकीय वर्तुळामध्ये दसरा मेळाव्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आले आहे. भरपावसामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी भाषण केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच भाजपच्या हिंदूत्वावर देखील त्यांनी टीका केली आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना देखील विरोधकांनी सुनावले. खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सभा सुरू असताना पाऊस आणि त्या पावसात विचलित न होता नेत्याने भाषण करणं हे अनेकदा झाल आहे. शरद पवार याचं भाषण फार गाजलं. पण कालचा शिवतीर्थवरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक होता असा मी म्हणतो. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तुफान झाला. पाऊस पडणार आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार आहे याचे पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी सगळ्यांशी चर्चा केली काय करायचे तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं परंपरा जी आहे तीच सोडायची नाही. अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्यात आहे अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो नाही तर ते चुकीचं आहे आणि आपण शिवतीर्थावर मेळावा घ्यावा आणि तुम्ही काल पाहिले असेल कालही पाऊस पडत होता या पावसात सभा झाली मेळावा झाला हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे महाराष्ट्र मधलं राजकीय चित्र आहे दर्शवणार आहे, असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पावसामध्ये पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपला भाषण पूर्ण केलं, किंबहुना उद्धव ठाकरे भाषण संपवायच्या मनस्थिती मध्ये होते पावसामुळे तेव्हा समोरून थांबू नका बोला अशा घोषणा केल्या येत होत्या, हे भाग्य आणि पुण्य फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतं हे फक्त त्यांच्यासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी आहे बाकी कोणासाठी नाही,” असा देखील टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज ठाकरे युती संदर्भात देखील उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “आमच्या भावना आहेतच. राज ठाकरे यांच्या विषयी आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असतील तरी एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नातं हे कायम ठेवलं म्हणून आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो. एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकलो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काही विषयी जाहीरपणे बोलू शकतात, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपला आहे आणि या शिवतीर्था पलीकडे जे शिवतीर्थ आहे तिथे सुद्धा आपल्या नातं आहे. आणि लोकांना हे नातं अधिक जड करायचा आहे ज्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे यांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा जो प्रतिसाद होता तो ही आपण पाहिला असेल. अर्थ तुम्ही विचारताय युतीची घोषणा कधी करणार आणि का केली नाही, पुढल्या काही दिवसात विचारला जाईल काल उद्धव ठाकरे यांची नक्की काय सांगितलं आपल्याला याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे एवढेच मी सांगू शकतो,” असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.