Mp sanjay raut taget modi government over india vs pakistan t20 cricket match asia cup 2005
India vs Pakistan T20 Cricket Match : मुंबई : येत्या 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना होणार आहे. यामुळे जोरदार राजकारण तापले आहे. भारतामध्ये पहलगाम हल्ला झाल्यामुळे पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने येतील. हा सामना रद्द करण्याची देशभरात मागणी होत आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, भाजप विसरला का? खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? असे प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवरुन मोदी सरकारला धारेवर धरले आहे. खासदार राऊत म्हणाले की,”14 सप्टेंबर ला अबूधाबी येथे भारत पाक सामना खेळवला जात आहे. हे लोकभावना विरुद्ध आहे. अजूनही २६ निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले, त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश अजूनही संपलेला नाहीये, अतिरेकी सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे असं सांगितलं जात्ं, पाकिस्तानच्या कारवाया कश्मिरमध्ये अजूनही थांबलेल्या नाहीत अशा वेळेला पाकिस्तानच कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजपाचे असली नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला. मात्र आता मॅच खेळली जात आहे,” अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खून आणि क्रिकेट एक साथ कैसा?
“खून आणि पाणी एक साथ बहेंगा नहीं… असे ते म्हणाले होते आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, आमच्या महिलांचा उजाडलेले सिंदूर तु्म्ही विसरलात, हा काय प्रकार आहे ?आमचा सवाल भारतीय जनता पार्टीला आहे. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्याची भारत पाक समान्या विषयी भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नरेंद्र मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार
त्याचबरोबर या भारत पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 14 तारखेला पाकिस्तान बरोबरच्या सामन्याचा निषेध करुन त्या सामन्यांना विरोध केलेला आहे. “शिवसेनेची महिला आघाडी त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझा कुंकू माझा देश अशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल. माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारच आंदोलन 14 तारखेला होईल. प्रधानमंत्री सिंदूर विसरलेत, राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिला नरेंद्र मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार आहेत, असं अभियान आम्ही घेणार आहोत,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.