• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Bjp Leader Navnath Ban Made Political Criticism Of Mp Sanjay Raut

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झाले संजय राऊतांचे वस्त्रहरण…; भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांच्या विजयाची अपेक्षा केली होती. यानंतर आता भाजप पक्षांच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 10, 2025 | 06:27 PM
BJP leader Navnath Ban made political criticism of MP Sanjay Raut

भाजप नेते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर राजकीय टीका केली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली असून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली आहेत. यानंतर महाराष्ट्रामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांच्या विजयाची अपेक्षा केली होती. यानंतर आता भाजप पक्षांच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संजय राऊतांचे वस्त्रहरण झाले असल्याची जहरी टीका भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने खासदार संजय राऊत यांना पुरते उघडे पाडले. उबाठा, राऊत आणि युपीएला आरसा दाखवणारी अशी ही निवडणूक होती. एनडीएची मते फुटून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएची सरशी होईल असा डंका वाजवणाऱ्या राऊतांना निकालानंतर ‘जोर का झटका’ बसला. निकालानंतर एनडीए आणि युपीए मध्ये तब्बल 150 मतांचा फरक समोर आला. उबाठाच्या खासदारांनीच उबाठा आणि तुमच्यावर काडीमात्र ही विश्वास ठेवला नाही. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढता-ओढता राऊतांची काय अवस्था झाली. पुरते उघडे पडूनही आमची इज्जत शाबूत आहे असा केविलवाणा दावा राऊत करत आहेत हे हास्यास्पद असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधींचं नेतृत्व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुरते निष्प्रभ ठरले आहे. युपीएच्या खासदारांनीच क्रॉस व्होटिंग करून आपली खदखद व्यक्त केली. यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे महाराष्ट्रातून एनडीएला सर्वाधिक साथ मिळाली. हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं आजचे सत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उचलली जीभ लावली टाळ्याला अशा आवेशात टीका करताना, 2019 मध्ये उबाठा आणि खासदार राऊत यांनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसूनही देवेंद्र फडणवीस पुन्हा उभे राहिले हे राऊत यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी खडसावले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची जादुई कांडी, त्यांचा करिष्मा, आणि त्यांची धोरणात्मक अचूकता दिसून आली आहे. राऊत तुम्हाला राज्यसभेत केवळ अर्ध्या मताने आघाडी मिळाली होती यांची जाणीव ठेवा, आणि पुढील तीन वर्षांत तुम्हाला पुन्हा राज्यसभा मिळणार नाही, हे ही सत्य स्वीकारा असाही टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नेपाळसारखे अराजक माजावे हीच राऊतांची इच्छा ?

संजय राऊत यांनी ही परिस्थिती देशामध्ये देखील उद्भवू शकते अशी शंका उपस्थित केली होती. यावर नवनाथ बन म्हणाले की, देशात नेपाळसारखे अराजक माजेल असे भविष्य वर्तवणारे राऊत हे खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? जसा खोपडे स्वराज्यात द्रोह करून गेला, तसेच महाराष्ट्रद्रोह आणि देशद्रोहाचे बीज तुम्ही रोवताय का? असा सवाल बन यांनी विचारला. हा देश स्वामी विवेकानंदांचा, महात्मा गांधींचा, आणि आज सक्षम नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदीजींचा आहे. येथे कधीही अराजकता माजणार नाही. खरं तर, जे तुमच्या मनात आहे तेच तुमच्या ओठावर आलं. भारताला नेपाळसारख्या अस्थिरतेत ढकलण्याची तुमची सुप्त इच्छा आहे का? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र आणि भारत इतके सक्षम आहेत की, तुमचे हे कपटी डाव कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट तुम्ही पेटवलेल्या आगीत तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नवनाथ बन यांनी दिला आहे.

Web Title: Bjp leader navnath ban made political criticism of mp sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Nepal News
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Nepal Violence : हिंसक निदर्शनांचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार; भारतात घुसखोरीचा प्रयत्नामुळे सीमेवर हाय अलर्ट
1

Nepal Violence : हिंसक निदर्शनांचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार; भारतात घुसखोरीचा प्रयत्नामुळे सीमेवर हाय अलर्ट

“अशा लोकांचा गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही…; मतफुटीच्या आरोपांवर खासदार संजय राऊतांचा चढला पारा
2

“अशा लोकांचा गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही…; मतफुटीच्या आरोपांवर खासदार संजय राऊतांचा चढला पारा

Nepal Crisis : नेपाळमधील अराजकतेच्या मागे अमेरिकेचा हात? राजकीय नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
3

Nepal Crisis : नेपाळमधील अराजकतेच्या मागे अमेरिकेचा हात? राजकीय नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ

Nepal Crises:’ जमाव माझ्या मागे लागला..’.; भारतीय महिलेने सांगितले नेपाळमधले भयावह वास्तव, पाहा Video
4

Nepal Crises:’ जमाव माझ्या मागे लागला..’.; भारतीय महिलेने सांगितले नेपाळमधले भयावह वास्तव, पाहा Video

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झाले संजय राऊतांचे वस्त्रहरण…; भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झाले संजय राऊतांचे वस्त्रहरण…; भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

Urban Company चा IPO अवघ्या २ तासांत फुल्ल, १२ सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीची संधी

Urban Company चा IPO अवघ्या २ तासांत फुल्ल, १२ सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीची संधी

Dahisar Toll Naka Relocation : मिरा-भाईंदर प्रवास कोंडीमुक्त होणार! दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर, काय आहे नवीन ठिकाण?

Dahisar Toll Naka Relocation : मिरा-भाईंदर प्रवास कोंडीमुक्त होणार! दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर, काय आहे नवीन ठिकाण?

Exclusive: ‘साबर बोंडं’ कसा झाला तयार, दिग्दर्शक रोहन कानवडेशी खास बातचीत; Vision उतरवले सत्यात

Exclusive: ‘साबर बोंडं’ कसा झाला तयार, दिग्दर्शक रोहन कानवडेशी खास बातचीत; Vision उतरवले सत्यात

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग

पीएनबीकडून ऑलिंपियन अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा सन्मान; हॉकी आशिया कपमधील कामगिरीचे केले कौतुक    

पीएनबीकडून ऑलिंपियन अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा सन्मान; हॉकी आशिया कपमधील कामगिरीचे केले कौतुक    

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.