'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमामध्ये खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे. अमित शाह यांच्या या टोलाचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, सत्तेतील मंडळी ही लाचार आणि डरपोक आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले. अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना कोणती आणि खोटी कोणती हे कळेल. मी पुन्हा एकदा सांगतो, की शाह सत्तेत नसतील तेव्हा खरी आणि खोटी शिवसेना कोणती याचा फैसला होईल, आज दहशत, पैशाची ताकद, निवडणूक आयोग हातात यामुळे हे घडल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यसाठी क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी केले. याबाबत राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरावे आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात घुसून त्यांनी चोऱ्यामाऱ्या करत पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला अमित शाह यांची दादगिरी दाखवू नका. ते काही अमृत पिऊन आले नाही. एक ना एक दिवस सर्वांना जावेच लागेल, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील याच कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचा उल्लेख लोहपुरुष म्हणून केला. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, अमित शाह लोहपुरूष मग सरदार वल्लभभाई पटेल कोण? बाळासाहेब ठाकरे कोण? एकनाथ शिंदे हे ‘वो डरा हुआ आदमी’ अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. खासदार राऊत यांनी कर्नाटक महाराष्ट्रावरील बॉर्डरवरील वादावर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घेत, चर्चेतून त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. सीमा प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची जबाबदारी असताना अटकेच्या भीतीने ते बेळगावमध्ये जात नाहीत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.