
'गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी...'; संजय राऊत यांचे टीकास्त्र
मुंबई : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच जागावाटपाच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. आतापर्यंत शिवसेनेने भाजपला जागा दिल्या. गेल्या ६० वर्षांत शिवसेनेने कधीही कोणाच्या दारात जाऊन सौदेबाजी केली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा गट तिकडे गेला, हे लाजिरवाणे असल्याचे राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेच्या मर्जीनुसार युती होत होती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाचारीची स्थिती निर्माण झाली. शिंदे यांनी ‘द्या, द्या’ अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या मर्जीनुसार युती होत होती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाचारीची स्थिती निर्माण झाली. शिवसेनेने भाजपची युती फेटाळली, तेव्हा शिवसेना स्वबळावर लढली. तेव्हा सफेद पॅन्टला गवत लावून येत होते. भाजप हा मराठी माणसाचा पक्ष नाही. त्यांचा आणि मराठीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षात उत्तर भारतीय असणारच.
तसेच वरळीतील नाराजीवर ते म्हणाले, नाराजी असू शकते. मात्र, आज संध्याकाळपर्यंत हे वातावरण निवळून जाईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे आम्ही स्वागत करतो. शरद पवार NDA सोबत जाणार नाहीत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन चालणारे लोक त्या विचारधारेच्या विरोधात जाणार नाहीत.
संयुक्त प्रचार सभा होणार का?
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये तसेच कल्याण-डोंबिवली येथे संयुक्त प्रचारसभा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला येणार यावर ते म्हणाले, ते पुतिनलाही प्रचाराला आणू शकतात, ट्रम्पलाही विनंती करतील. इथे दुसऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री का आणायचे? ही आपली निवडणूक आहे, आपण ती आपल्याच ताकदीवर लढवू. कोणी म्हणाले ‘जय श्रीराम’चा नारा लागेल, पण इथे फक्त ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ हेच नारे चालतील.
हेदेखील वाचा : ‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान