आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : राज्यामध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये लाडक्या बहीण योजनेला निवडणुकीतील आश्वासनांप्रमाणे वाढवून निधी न दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सध्या महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातात. मात्र निवडणुकीमध्ये 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यंदाच्या अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय घेण्याची शक्यता होती. मात्र लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “9 लाख 32 हजार कोटींच महाराष्ट्रावर कर्ज आहे. आता कर्ज काढून राज्य चालवल जाते आहे. राज्य़ लुटलं जातंय. राज्यावरच कर्जाचं ओझ दिवसेंदिवस वाढतंय हे माहित असताना सुद्धा लाडक्या बहिणी सारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळी सारख्या गरिबांच्या योजना, शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहिण योजना सुद्धा बंद करतील. सरकार समोर हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकीत मत विकत घेणं हा म्हणजे कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांची मत विकत घेण्यासाठी वापरली,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ महायुतीच्या जाहीरनाम्यात दोन प्रमुख घोषणा आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर शेतकऱ्यांना कर्ज माफी या घोषणा आहेत. त्याचं तुम्ही काय करणार याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालं पाहिजे. आठ लाख हजार कोटीच्या वरच कर्ज हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती?. शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. टेंडर देण्यात आले. ते पैसे निवडणुकीचत वापरले असतील किंवा आमदार खरेदीसाठी वापरले असावेत” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशभरामध्ये होळीचा सण साजरा केला जातो आहे. तर गणेशोत्सवामध्ये वापरल्या जाणाऱ्या पीओपीच्या मुर्तीवरुन वादंग सुरु आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “वरळीत होळीला परवानगी मिळत नाहीय. त्यानंतर उद्या गणेशोत्सव येणार आहे. पीओपीच्या मुर्तींवरती बंदी आणलेली आहे, हे कसलं हिंदुत्व? वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणताय. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता, मग आता काय झालं? अशी प्रश्नांची सरबत्ती खासदार संजय राऊत यांनी केली आहे.