mp sanjay raut target cm devendra fadnavis and raj thackeray meet political news
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळावा पार पडला आहे. नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये स्वर्गीय नेते AI चा वापर करुन बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवले. यावरुन शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत टीका देखील केली. यावर ठाकरे गटातून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्यांनी बनावट शिवसेना निर्माण केली त्यांनी बोलू नये. बनावट शिवसेना नावाचा वापर करून एक शिवसेना अमित शाह यांनी निर्माण केली आणि ती शिंदेंना चालवायला दिली. बाळासाहेबांच्या आवाजाचा प्रयोग आम्ही मुलुंडमध्ये सुद्धा याआधी केला आहे. विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तंत्रज्ञानाविषयी आम्ही देश कसा पुढे नेतोय हे सांगितलं. अमित शाह यांनी बनावट शिवसेना निर्माण केली आणि बनावट नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. यावरुन खासदार राऊत म्हणाले की, “धर्मवीरचे पाच 25 भाग काढतील, ती वेब सिरीज आहे. आनंद दिघे यांना मी जास्त ओळखतो. त्यांच्या नावाने बनावट भूमिका आणि बनावट संवाद निर्माण केलेलं चाललं का? धर्मवीरांचं तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही जास्त दिवस त्यांच्यासोबत राहिलो आहोत. आनंद दिघे यांना ज्या प्रकारे तुम्ही बनावट पद्धतीने पडद्यावर आणलं त्याबद्दल तुम्ही बोला,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “गिरीश महाजन यांचे मानसिक स्वास्थ का बिघडलं आहे हे आपल्याला माहिती आहे. ते अनेक खटलेबाजीमध्ये अडकून पडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी देशात शिवजयंतीला सुट्टी जाहीर करावी असं म्हंटलं आहेत देशात शिवजयंतीला सुट्टी जाहीर करावी ही मागणी का आम्ही केली ? अमित शाह यांनी रायगडावर येऊन प्रवचन दिलं. शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. आम्ही त्यांना बोललो तुम्ही शिवाजी शिवाजी असा?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणच्या समुद्रावर उभा राहत आहे. त्याचं स्वागत आहे पण पहिला पुतळा का कोसळला? खऱ्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार बाहेर का ? त्यात जो भ्रष्टाचार झाला आणि त्याचा पैसा स्थानिक राजकारणाकडे गेला. तो पैसा निवडणुकीत वापरला. त्यांच्यावर काय कारवाई झाली याची माहिती पुतळ्याचे अनावरण होण्याआधी द्यायला हवी,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.