BJP media department chief Navnath Ban targets MP Sanjay Raut over Vice Presidential election 2025
Sanjay Raut Marathi News : मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांसोबत चर्चा केली आहे. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुनहरी बाग रस्त्यावरील शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’तील पक्षनेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. मात्र उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेमध्ये बसल्यामुळे भाजप व शिंदे गटाने जोरदार टीका केली आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या ठिकाणावरुन होणाऱ्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. प्रतिज्ञापत्र काय मागताय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून चोरी पकडून दाखवली आहे. चीफ आहेत, सडके बटाटे आहेत , हे काय आहे हे सरळ दिसतं ना…तुम्ही सरळ मार्गाने निवडून आले नाहीत. निवडणूक आयोग खोट बोलतंय. निवडणूक आयोग मोदी आणि शाह यांचे गुलाम आहे. चोराला चोर साथीदार आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेत बसल्याचे सांगितले जात असल्यावर मोबाईलमधील इतर फोटो बघितला नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. दिल्लीतील बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवण्यात आल्याच्या मुद्दावरून टीका करणाऱ्यांना देखील खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, “नरेश मस्के म्हणजे दुतोंडाचे गांडूळ आहे. स्क्रीनवरील माहिती बघण्यासाठी मागे बसलो होतो. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची चोरी त्यांचाच बेवसाईटवरून पकडली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलतंय. निवडणूक आयोग भाजपाचा हस्तक आहे,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींना राहुल गांधी यांनी देशासमोर सरेंडर करायला लावलंय. सळो की पळो करून सोडलंय राहुल गांधी यांनी मोदींना. राहुल गांधींनी सांगितले की, ट्रम्प यांच्यासमोर नरेंद्र मोदी कशाप्रकारे शरणागत झाले आहेत. कोणाच्या टोक्यात चीफ आहे किंवा नाही हे कळाले. जर तुमच्या टोक्यात चीफ असतील तर तुम्ही ऑपरेशन सिंदूर हे ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन थांबवले नसते हो,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.