रतन टाटा उद्योगपती नव्हते तर देशाचे आधारस्तंभ होतो; संजय राऊत यांच्याकडे आदरांजली
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अत्याचार प्रकरण झाल्यानंतर आंदोलनावेळी विरोधकांनी करक शिक्षा करत भररस्त्यांवर फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांकडून स्वरक्षणार्थ अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्यानंतर मात्र विरोधकांनी टीका केली आहे. त्याला न्यायाप्रमाणे शिक्षा दिली पाहिजे होती. तसेच या एन्काऊंटरमधून इतर आरोपींची नावं झाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता या संदर्भामध्ये ठाकरेसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. मुंबई आणि बदलापूर परिसरामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास पोस्टर झळकत आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये बंदूक असून ते निशाणा रोखताना दिसत आहेत. या पोस्टरवर बदलापूर असा सूचक संदेश देण्यात आला आहे. यावर पोस्टरवरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “हे लोकं स्वतःला सिंघम समजत आहेत. आता महाराष्ट्रात मी सिंघम की तू सिंघम अशी चढाओढ सुरू आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातात बंदूक दाखवली आहे, जणू यांना परमवीर चक्र देणार आहेत. मोठे शौर्य दाखवले आहे. या महाराष्ट्रात अनेक बलात्कार झाले. ठाणे जिल्ह्यात, नागपूरमध्ये बलात्कार झालेत, किती जणांचे एन्काऊंटर तुम्ही करणार आहात?” असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
बदलापूर प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित शाळेतील विश्वस्तांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. बदलापूरच्या शाळेतील विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि ॲडल्ट व्हिडिओ सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. खासदार राऊत म्हणाले की, “तुम्हाला कोणाला तरी वाचवायचे आहे. यातले दोन-तीन लोक आहेत, त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही बळी घेतला आहे. पुरावा नष्ट केला आहे. एक याचिका दाखल झाली आहे. त्यात या शाळेत अश्लील व्हिडिओ करण्याचा खेळ सुरू होता. त्या व्यक्ती भाजप आणि संघाशी संबंधित होत्या,” असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.