
महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले
2 तारखेला मतदान आणि 3 डिसेंबरला लागणार निकाल
शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या प्रचारात श्रीकांत शिंदेंची फटकेबाजी
शिरपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक होणार आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 तारखेला निकालजाहीर होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. प्रचाराला वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी साक्री तालुक्यातील पांजरा साखर कारखान्याचा प्रश्न सोडवला, त्याचप्रमाणे शिरपूर सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न सोडवून तो लवकरात लवकर सुरू करु, असे आश्वासन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी घेतलेल्या जाहीर सभेत खासदार डॉ. शिंदे बोलत होते. कोणी मतदारांना दम देण्याचे काम करत असेल, तर शिरपूरकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आम्ही पण महायुतीत आहोत, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला.
Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाकरिता शिवसेनेचे हेमंत पाटील निवडणूक लढवत आहेत. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की शिवसेनेने सर्वसामान्य घरातील उमेदवार आम्ही दिले आहेत. त्यामुळे एकवेळ शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यावर आणि हेमंत पाटील यांच्यावर विश्वास दाखवा. शिरपूर नगरपालिकेवर भगवा फडकवून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांना केले. राज्यात केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे, तर येथील युवकांच्या हाताला काम मिळणे महत्त्वाचे आहे. शिरपूरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठे असून हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिरपूरच्या जनतेने ही निवडणूक आता आपल्या हातात घेतली असून, येथील ‘उठाव’ हा सर्वसामान्यांच्या स्वाभिमानासाठी आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले,
शिरपूरमध्ये नगर विकास खात्याचा मोठा निधी आला, पण विकास कुठे आहे? केवळ रस्ते चकाचक झाले म्हणजे विकास होत नाही. आजही शहरात पाणीपट्टी आणि घरपट्टीचे प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारी वाढली आहे. आम्ही केवळ मते मागायला आलेलो नाही, तर तुमचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. मुंबईत ज्याप्रमाणे शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला, त्याच धर्तीवर शिरपूरमधील वस्त्यांचे आणि घरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु, हे केवळ निवडणुकीपुरते खोटे आश्वासन नसून, हे आमचे वचन आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. शिरपूर नगरपालिकेवर भगवा फडकवून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांना केले.
Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यात प्रचंड यशस्वी ठरली. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने विधानसभेत महायुतीला मोठं यश मिळाले. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचवणारे नेतृत्व आहे. रिक्षा चालवणारा सामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतो, हे या लोकशाहीचे यश आहे. जेव्हा शिवसेनेत उठाव झाला, तेव्हा अनेकजण म्हणायचे की ही शिवसेना किती दिवस टिकेल? पण आज शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे हे कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे यश आहे, असे ते म्हणाले.