MP Supriya Sule to file PIL against Ladki Bahin scheme by mahayuti government
Supriya Sule News : पुणे : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा महायुतीला निवडणूक जिंकण्यामध्ये मोठा फायदा झाला. मात्र त्यावेळी योग्य निकषाने अर्ज मंजूर न केल्यामुळे अनेक बोगस अर्ज मंजूर झाले आहेत. याची चौकशी आता सरकारकडून केली जात असली तरी गेले अनेक महिने या बोगस अर्जदारांनी सरकारच्या पैशांवर डल्ला मारला आहे. यावरुन आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. खासदार सुप्रिया सुळे या स्वतः या योजनेसंदर्भात पीआयएल दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली. तसेच हरकत नोंदवणार असल्याचे देखील खासदार सुळे म्हणाल्या आहेत. “पुण्यातील प्रभाग रचनामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अस्वस्थता आहेत. याबाबत आम्ही विंनती करणात आहोत हरकतीची तारीख 10 तारखेपर्यत वाढून द्यावी. तसेच पहलगाम हल्यातील कुटुंबांना नोकरी देण्याचा शब्द पाळावा, त्या विषयासंदर्भा आयुक्ताशी चर्चा झाली . नागरिक हा केंद्रबिंदू असावा निवडणूक जिंकणं हा केंद्रबिंदू नसावा. वाहतूक कोंडी, खड्ड्यात पुण्यातील नागरिक भरडले जात आहेत. कर कमी होत नाही मात्र महागाई, बेरोजगारी वाढत आहेत. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत असल्याचं मी वर्षभर सांगत आहे,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केले आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेचे फॉर्म काय निकष लावून भरून घेतले आणि आता काय निकष लावून कॅन्सल करत आहात? स्त्री आणि पुरुष यांच्यातला फरक न कळण्यासारखं कोणतं सॉफ्टवेअर वापरलं?लाडकी बहीण योजनेवर मोठी जम्बो चौकशी लावली पाहिजे. लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाला त्याची चौकशी व्हावी,” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापलिकेत समाविष्ट असलेल्या भागातील विविध मुद्द्यांबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम याच्यासोबत बैठक घेतली. यावेळी धायरी डिपी रोड, कात्रज पूल, ट्रॅफिक, आणि महपलिकेतील समाविष्ट गावांमधील पायाभूत समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी… pic.twitter.com/gRLFCFOD1y
— Supriya Sule (@supriya_sule) August 25, 2025
पुढे त्या म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेतील बोगस अर्जदारांवर छगन भुजबळ म्हणाले कारवाई करा पण कारवाई करायची कुणावर? तुम्ही फॉर्म भरताना आधार कार्ड, केवायसी चेक केले नाही का? मायबाप सरकारने योजना बंद करून कसं चालेल? त्याने प्रश्न सुटणार नाही. मायबाप सरकारने यातून मार्ग काढावा. मी स्वतः यासंदर्भात पीआयएल दाखल करणार,” असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये लाडकी बहीण योजनेवरुन पुन्हा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “इंदापूरमध्ये 17 हजार मतदार वाढले हे कालच ऐकलं, सगळीकडे तशीच परिस्थिती आहे. संविधानाने एका मताचा अधिकार दिला तर त्याच नियमाने देश चालला पाहिजे. दुबार मतदान व्हायला नको, हेच माझं म्हणणं आहे. काही घर आणि शाळा भूसंपादनात जात असल्यानं रिंग रोडसाठी 50 मीटर लांबून रुट घ्यावा. दर तीन तासात शेतकरी आत्महत्या करत आहे, हे या सरकारच्या मंत्र्यांचंच म्हणणं आहे. शिक्षक, अधिकारीही आत्महत्या करत आहेत. ते भ्रष्टाचार मुक्त देश करणार म्हटले होते. महाराष्ट्रात ज्यांच्यावर आरोप केले त्यांचं काय झालं? आम्ही उगीच भाजपला वॉशिंगमशीन म्हणत नाही,” असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.