Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी

Drug Inspector Paper Leak: पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक, परिचित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपास यंत्रणांकडून तपासली जात आहे. याच तपासादरम्यान गणेश देवरे यांचा आरोपी गौरव पाटील यांच्याशी जवळचा संबंध असल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 05, 2026 | 10:49 AM
MPSC Drug Inspector Paper Leak Update

MPSC Drug Inspector Paper Leak Update

Follow Us
Follow Us:
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयापर्यंत
  • झिरवळ यांचे OSD गणेश देवरे यांची मुंबई विशेष शाखेच्या पथकाकडून कसून चौकशी
  • मुख्य आरोपी गौरव पाटील याच्या घरात OSD देवरे गेल्या ३ वर्षांपासून राहत असल्याचे उघड
MPSC Drug Inspector Paper Leak Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुरुवातीला या प्रकरणात एक प्रेमप्रकरण आणि त्यानंतर हेट स्टोरीचा संबंध असल्याचे सांगितले जात होते. पण त्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट नरहरी झिरवळ यांच्या अन्न आणि औषधी मंत्रालयापर्यंत पोहचल्याची चर्चा सुरू झाली आहे. लाचखोरी प्रकरणामुळे आधीच अन्न आणि औषध मंत्रालयाची मोठी बदनामी झाली होती. त्यानंतर आता थेट पेपरफुटी प्रकरणातही या मंत्रालयाचा संबंध जोडला जाऊ लागला आहे.

यांसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांची मुंबई विशेष शाखेच्या पथकाकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी गौरव पाटीलच्या घरात झिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी भाडेकरु म्हणून राहत असल्याचे तपासात आढळून आले आहेत. आरोप गौरव पाटील यांच्या घरात झिरवळ यांचे ओएसडी गणेश देवरे हे गौरव पाटील यांच्या घरात राहत असल्याने पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत पोहचले नाहीत ना, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी

पोलिसांच्या तपासात काय आले समोर?

गणेश देवरे हे गेल्या तीन वर्षांपासून गौरव पाटील यांच्या घरात राहत असल्याचे तपासातून समोर आला आहे. गणेश देवरे हे कृषी विभागात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आता गौरव पाटला आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या कथित संबंधांमुळे या प्रकरणात अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, या संबंधावरून गैरप्रकारात त्यांचा सहभाग सिद्ध होत नाही. पोलिसांच्या तपासातून याबाबत नेमके काय समोर येते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सर्व आरोपी एकाच कॉलनीतील?

पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक, परिचित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपास यंत्रणांकडून तपासली जात आहे. याच तपासादरम्यान गणेश देवरे यांचा आरोपी गौरव पाटील यांच्याशी जवळचा संबंध असल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

आरोपी ऋतुजा पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील, यांच्यासह मंत्री नरहरी झिरवळ यांचे OSD गणेश देवरे हे नंदुरबारमधील एकाच कॉलनीतील राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर या व्यक्तींमधील नेमके संबंध काय होते आणि पेपरफुटी प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

आयोगाच्या कार्यालयाच्या आवारातच पैशांचा व्यवहार?

धक्कादायक बाब मम्हणजे औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात प्रश्नसंच मिळवण्यासाठी पैशांचा व्यवहार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यालयाच्या आवारातच झाल्याचा दावा तपासादरम्यान केला जात आहे. आयोगाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग लॉबीमध्ये पाच लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

तपासातील माहितीनुसार, आयोगाच्या गोपनीय कक्षात उपलब्ध असलेल्या प्रश्नांपैकी 294 प्रश्नांचा स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आला. अधिकारी विश्वेश्वर नकाते याने हा प्रश्नसंच गोपनीय कक्षातून बाहेर काढून त्याची झेरॉक्स केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लॅपटॉपवर प्रश्न टाईप करून स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.

हा प्रश्नसंच नकाते याने अवर सचिव अभिजीत लेंडवे याच्याकडे दिल्याचे तपासात सांगितले जात आहे. त्यानंतर तो कक्ष अधिकारी गोपाळ मराठे याच्याकडे आणि पुढे प्रवीण पाटीलकडे देण्यात आल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण गौरव पाटील, गणेश देवरे यांच्यापासून अभिजीत लेंडवे यांच्या साखळीळे हा प्रश्नसंच गोपनीय कक्षातून बाहेर कसा पडला, आणि तो कोणाकोणापर्यंत पोहोचला आणि पैशांचा व्यवहार नेमका कुठे व कोणामध्ये झाला, यादृष्टीने तपास केला जात आहे.

 

Web Title: Mpsc drug inspector paper leak minister narhari zirwal osd ganesh devare interrogated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • MPSC

संबंधित बातम्या

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
1

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या
2

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.