Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही’; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – नसीम खान

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील चांदिवली येथे काँग्रेसने तिरंगा मार्च काढला. यावेळी नसीम खान यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील आणि पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Jul 26, 2026 | 10:31 PM
'धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही'; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – नसीम खान

'धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही'; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – नसीम खान

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा संघर्षाचा शेवट नसल्याचे नसीम खान यांचे मत
  • पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी काँग्रेसची मागणी
  • विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी
 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघात आयोजित विजयी ‘तिरंगा मार्च’ दरम्यान काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

बैलबाजार महानगरपालिका शाळेपासून सुरू झालेला तिरंगा मार्च बेदी हॉल, काजूपाडा पाइपलाईन आणि ९० फूट रोड मार्गे साकीनाका मेट्रो स्थानकापर्यंत काढण्यात आला. राष्ट्रगीताने या मार्चची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांमध्ये मिठाई वाटून आंदोलनातील टप्प्याचे यश साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यातील केवळ पहिला टप्पा आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

त्यांनी पुढे सांगितले की, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.

नसीम खान यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवल्याचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांच्या हितासाठी पक्ष पुढेही आंदोलनाची भूमिका कायम ठेवणार असल्याचे सांगितले.

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण

याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांबाबत सरकारने अधिक उत्तरदायी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असताना, काँग्रेसने हा संघर्ष अद्याप संपलेला नसून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पुढील काळातही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Web Title: Naseem khan on dharmendra pradhan resignation congress protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:31 PM

Topics:  

  • Congress
  • Dharmendra Pradhan
  • Mumbai Congress protests

संबंधित बातम्या

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
1

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
2

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
3

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप
4

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.