Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

Kolhapur Gokul Politics News: माझ्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. अदृश्य शक्तीने त्यांनी काय काय केले, हे तुम्ही पाहिले असेल. आता लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. कारण अशा प्रकारची घटना कोणासोबतही घडू शकते. आमची सत्ता आली नाही म्हणून कायदा बदलायचा, हा प्रकार आहे

  • By anuradha sagar
Updated On: Nov 05, 2026 | 02:45 PM
Satej Patil Kolhapur Protest March Nov 9, Gokul Milk Union Nominated Directors Row,

Satej Patil Kolhapur Protest March Nov 9, Gokul Milk Union Nominated Directors Row,

Follow Us
Follow Us:
  •   सतेज पाटलांचा सरकारवर ‘सत्ता चोरी’चा आरोप 
  • महायुतीकडून दूध उत्पादकांच्या जनादेशाचा अपमान
  • गोकुळला संपवून ते ‘अमूल’च्या घशात घालण्याचा डाव
Kolhapur Gokul Politics News: गोकुळची सत्ता मिळवायची आणि कोल्हापुरकरांनी आमच्या बाजुने दिलेला कौल नाकारायचे काम सरकारने केल आहे. याचा आम्ही निषेध करतो. पण कालच्या मंत्रिमंडळाचा निर्णयाचाही आम्ही निषेध करत आहोत. आमचं बहुमत तांत्रिक मुद्दा काढून ते बहुमत स्वत:कडे वळवायचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. याचे उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे.अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

कोल्हापुरातील ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेला सत्तासंघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होणार असल्याचे दिसत आहे. महायुतीने सतेज पाटील यांच्या समविचार आघाडीला रोखण्यासाठी नवी खेळी केली आहे. गोकुळच्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने या मोठ्या संस्थेवर ५ शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या आणि त्यापैकी ४ बिगर-शासकीय सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

‘सरकारला सत्तेची मस्ती’; ‘गोकुळ’वरून खासदार संजय राऊत आक्रमक+

दसरा चौकातून जिल्हा कार्यालयावर मोर्चाची घोषणा

सतेज पाटील यांनी या निर्णयाला विरोध करत सतेज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोकुळसाठी आता रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले असून येत्या 9 नोव्हेंबरला कोल्हापुरमधील दसरा चौकातून जिल्हा कार्यालयावर मोर्चाची घोषणाही सतेज पाटील यांनी केली. सतेज पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

म्हणून तुम्ही कायदा बदलत आहात- सतेज पाटील

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा तर महायुतीला 12 जागा मिळाल्या. पण अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक कोरम पक्षाकडे नाही. पण चार शासकीय सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळाल्यास महायुतीचा अध्यक्ष होऊ शकतो. या चार सदल्यांच्या मंजुरीची फाईल राज्य पालांकडे स्वाक्षरीसाठी दाखल करण्यात आली आहे. पण केवळ निवडणुकीचा निकाल तुमच्या बाजुने लागला नाही. म्हणून तुम्ही कायदा बदलत आहात. पण निवडणुकीच्या आधी गोकुळमध्ये कायदा बदलायला पाहिजे होता. आता तुम्ही तज्ज्ञ संचालक नेमत आहात, ज्यांना मतदारांनीच नाकारलं आहे त्यांना तज्ज्ञ म्हणत आहात. तज्ज्ञ असते तर त्यांना लोकांनी नाकारले नसते, पण आमचा कायदेशीर लढा सुरूच राहणार आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

गोकुळला अमुलच्या घशात घालण्याचा या सरकारचा डाव आहे. राज्यातील लोकशाही व्यवस्था हाणून पाडण्याचं काम राज्य सरकार करत आहे. हसन मुश्रीफांसोबत आता कुठली दोस्ती करत आहात असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच अमुलमध्येही असेच संचालक नेमण्यात आले होते. पण हायकोर्टाने ते नाकारलं. उत्पादकांनी तुम्हाला नाकारलं आहे.केवळ गोकुळसाठीच हा कायदा का लागू केला जात आहे, असा सवाल तेज पाटील यांनी विचारला आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा अनेक पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी

आमच्याकडे बहुमत आहे.याचा न्यायालयात निर्णय होईलच, असा आम्हाला विश्वास आहे. जनतेने नाकारले आणि न्यायालयाचा निर्णय आपल्या विरोधात जाईल, हे लक्षात आल्याने त्यांनी कायदा बदलण्याचा प्रकार केला. पण तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही. तुम्हाला केवळ सत्तेत बसायचे आहे, हाच तुमचा एकमेव उद्देश आहे. व्होट चोरीविरोधात आवाज उठवला जात असताना आता यांच्याकडून सत्ता चोरी सुरू झाली आहे.

माझ्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. अदृश्य शक्तीने त्यांनी काय काय केले, हे तुम्ही पाहिले असेल. आता लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. कारण अशा प्रकारची घटना कोणासोबतही घडू शकते. आमची सत्ता आली नाही म्हणून कायदा बदलायचा, हा प्रकार आहे.याकडेही सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं आहे.

याची सुरुवात गोकुळपासून झाली असून, पुढे हा प्रकार SRA पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सरकारने कोल्हापूरकरांचा अपमान केला आहे. मतदानातून जनतेने आपला संदेश दिला असतानाही सरकारकडून त्यांचा अपमान केला जात आहे. सहकाराची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. मात्र, याच सहकार क्षेत्राच्या विरोधात सरकार असा कायदा आणत आहे. आमची रणनीती तयार आहे; मात्र ती आताच सांगणार नाही.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर कोणती टीका केली आहे?

    Ans: "गोकुळ निवडणुकीत जनतेने बहुमत देऊनही, निवडणूक संपल्यानंतर नियम बदलून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे म्हणजे 'वोट चोरीनंतर सत्ता चोरी' करणे आहे," अशी तीव्र टीका सतेज पाटलांनी केली.

  • Que: सतेज पाटील यांनी कोणत्या आंदोलनाची घोषणा केली आहे?

    Ans: राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आणि कोल्हापूरच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी येत्या ९ नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य 'संघर्ष मोर्चा' काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

  • Que: गोकुळच्या सत्तासंघर्षात अमूलचा मुद्दा कसा उपस्थित झाला?

    Ans: गोकुळ दूध संघाला खिळखिळे करून तो 'अमूल'च्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकार रचत असल्याचा गंभीर संशय सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Satej patil criticized mahayuti govt ongokul nominated directors as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Congress
  • Gokul Milk
  • Hasan Mushrif
  • Kolhapur Politics
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा
1

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा

Kolhapur News : ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा
2

Kolhapur News : ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
3

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज
4

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.