
NCP Bajrang Sonawane criticized the Election Commission by holding a press conference
Maharashtra Politics : बीड : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांनी देखील जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. बीडमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये निवडणूकीचा प्रचार सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकार परिषदे दम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच धमकी देऊन टाकली आहे. तसेच अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेमध्ये धमकी दिली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार दिले आहेत. यातील दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले होते. हे अर्ज कोणाच्यातरी दबावाखाली अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. खासदार सोनावणे म्हणाले की, आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्या फॉर्मला वेगळा न्याय. लाटकर नावाचा आहे लाट्या. किती दिवस झाले त्याला सांगितले… लोकसभेला तोच… विधानसभेला तोच… नगरपरिषदेला तोच… मनानं बदलून गेला तर ठीक नाही तर त्याचा काय कार्यक्रम करायचा खासदार म्हणून तो करेल.. त्याला काय वाटायला लागले..अशा शब्दांत बजरंग सोनावणे यांनी टीकास्त्र डागले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ते.. एक फॉर्म यावर निरंक केलेला आहे तो बाद होतो.. दुसरा फॉर्म वैध होतो ते आम्ही कोर्टात प्रेझेंट करणार आहोत. लाट करणे लाटणे बंद केले पाहिजे नाही तर लाटणे घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येतील असे सोनवणे यांनी म्हटले आहे. खासदार सोनवणे यांनी अशा पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकार्यावर बोलण्याने तसेच एकेरी भाषेत उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच आक्षेप देखील घेतला जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वडगाव मावळमध्ये महायुतीमध्ये पेटले रान
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजपवर थेट आणि खळबळजनक आरोपांची सरबत्ती करत वातावरण तापवले आहे. एका प्रबळ सभेत बोलताना त्यांनी भाजपकडून पैशांच्या बळावर उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप केला. भाजपच्या एका महिला उमेदवाराचा दाखला देत शेळके म्हणाले,
“अचानक एका महिला उमेदवाराला राजकारणात का आणले? ‘गुलाब काकांकडे लय माल आलाय’ म्हणून उमेदवारी दिली का? पैशांच्या जोरावर उमेदवार ठरवणार्या पक्षाकडून शहराचा विकास कसा अपेक्षित?” या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.