संग्रहित फोटो
घटनेची माहिती शिक्षिका लंघे यांनी मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे यांना दिली. त्यांनी तत्काळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बेंद्रे यांना कळवले. बेंद्रे यांनी वनविभागाला माहिती देताच विभागाच्या पथकाने शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला.
शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण कायम
गेल्या काही महिन्यांपासून आंबळे परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असून, बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आहे. यामुळे नागरिक, महिला, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण कायम आहे. तरीही वनविभागाने योग्य ती प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात
वनविभागाकडे शिरूरच्या पूर्व भागात तब्बल 200 ते 300 बिबटे असल्याची माहिती चर्चेत असली, तरी अधिकृतरीत्या विभागाने यास दुजोरा दिलेला नाही. मात्र,बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे चित्र वारंवार येणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.
ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील
वनविभागाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा तसेच बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. “वेळीच उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील,” असा इशारा सरपंच सोमनाथ बेद्रे व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अण्णा बेंद्रे यांनी दिला आहे.






